Cruise Drug Party ला मुंबई पोलिसांची संमतीच नव्हती, पोलिसांकडून चौकशी सुरू

जाणून घ्या मुंबई पोलिसांनी आणखी काय काय म्हटलं आहे
Cruise Drug Party ला मुंबई पोलिसांची संमतीच नव्हती, पोलिसांकडून चौकशी सुरू

NCB म्हणजेच अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने उघड केलेल्या क्रूझ पार्टीची मुंबई पोलिसांकडून संमती घेण्यातच आली नव्हती ही बाब आता समोर आली आहे. या पार्टीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक झाली आहे. आता या पार्टीसाठीची कोणतीही संमती घेण्यात आली नव्हती. तसंच मुंबई पोलिसांना यासंबंधीचे कोणतेही लेखी पत्रही देण्यात आलं नव्हतं हेदेखील समोर आलं आहे. मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर 2 ऑक्टोबर रोजी धाड टाकली होती. या कारवाईत एनसीबीने आठ जणांना अटक केली होती. तर काही जणांना ताब्यात घेतलं होतं.

Cruise Drug Party ला मुंबई पोलिसांची संमतीच नव्हती, पोलिसांकडून चौकशी सुरू
संजय दत्त, सलमान खान आणि आता आर्यन: कोण आहेत वकील सतीश मानेशिंदे, ज्यांना बॉलिवूडकरांची पसंती?

या क्रूझ शिपला संमती कशी मिळाली याची चौकशी आता केली जाते आहे. त्याबाबत मुंबई पोलीस भूमिका मांडलीत. राज्यात सध्या साथरोग प्रतिबंधक कायदा Covid 19 मुळे लागू आहे. आता या पार्टीत कलम 188 चं उल्लंघन झालं का हेदेखील तपासलं जातं आहे. एवढंच नाही तर जमावबंदीचं कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यानुसार पाचपेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमू शकत नाहीत.

विविध एजन्सीजकडून या शिपला संमती देण्यात आली आहे. जर या प्रकरणात काही चुकीचं आढळलं तर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जाणार आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या क्रूझला येलो गेट पोलीस स्टेशनने संमती देणं आवश्यक आहे. मात्र या पोलीस स्टेशनकडून कुठलीही संमती घेण्यात आली नव्हती तसंच त्यांना याबाबत सूचितही करण्यात आलं नव्हतं.

एनसीबीने रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. चौकशी आणि वैद्यकीय चाचणी केल्यानंतर एनसीबीने आठ जणांवर अटकेची कारवाई केली.

Cruise Drug Party ला मुंबई पोलिसांची संमतीच नव्हती, पोलिसांकडून चौकशी सुरू
Aryan Khan Arrest : आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलेली कार्डेलिया क्रूझ आतून आहे कशी?

ड्रग्स पार्टीच्या छाप्याची Inside Story

एनसीबीनं एक निवेदन जारी करत संपूर्ण कार्यवाहीची माहिती दिली आहे. दोन ऑक्टोबरला कार्डेलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला. क्रूझवरील सर्वांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. चरस, कोकेन, एमडीएमए ड्रग्ज टॅब्लेट्स आणि एमडी ड्रग्स यावेळी सापडले आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्रूझ पार्टीची एनसीबीला 15 दिवसांपूर्वीच माहिती मिळाली होती. एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितलं, की क्रूझ पार्टीबद्दल शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि जहाजबांधणी मंत्रालयाला सविस्तर अहवाल दिला जाईल. या पार्टीबद्दल आम्हाला 15 दिवसांपूर्वीच गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतरच आम्ही ऑपरेशन सुरू केलं.

एनसीबीचे 22 अधिकारी प्रवाशी बनून क्रूझवर गेले. त्यावेळी क्रूझवर 1800 लोक होते. त्यामधूनच अंमली पदार्थ प्रकरणात 8 लोकांना आम्ही शोधून काढलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी, काही जणांकडून ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या सर्वांनी अत्यंत हुशारीने ड्रग्स आपल्यासोबत आणलं होतं. काही जणांनी हे ड्रग्स आपल्या चप्पल, शर्टची कॉलर, ब्लेट, बॅगेतील हँडल यामध्ये लपवून आणलं होतं. तर काही जणांनी आपल्या अंतर्वस्त्रात देखील ड्रग्स लपवून आणलं होतं.

Related Stories

No stories found.