प्रवाशाचा मोबाईल घेऊन पळत होता चोरटा, पोलिसांनी पाठलाग करत घेतलं ताब्यात, पाहा थरारक व्हिडीओ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– शिवशंकर तिवारी, मुंबई प्रतिनिधी

आपलं कर्तव्य बजावत असताना मुंबई पोलिसांचे अधिकारी कधीच कुचराई करत नाहीत. रेल्वे स्थानकात आतापर्यंत पोलिसांनी अनेकदा ट्रेनखाली येणाऱ्या लोकांचे जीव वाचवले आहेत. मुंबईच्या कांदिवली रेल्वे स्थानकात पोलीस कर्मचाऱ्यांच्या सजगतेमुळे एक मोबाईल चोर पकडला गेला आहे.

ड्युटी संपवून घरी जात असलेल्या पोलीस शिपाई योगेश हिरेमठ यांनी या मोबाईल चोराचा रेल्वे ट्रॅकमध्ये उतरुन पाठलाग करत त्याला अटक केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कांदिवली रेल्वे स्थानकात पोलिसांनी चोराचा केलेला हा फिल्मी स्टाईल पाठलाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कांदिवली स्थानकावर एक गाडी येऊन थांबताच आरोपीने एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावला आणि विरुद्ध दिशेने उडी मारत धूम ठोकली.

यावेळी चोराला वाटलं की आता आपल्याला कोणीही पकडू शकणार नाही. परंतू त्याच्या दुर्दैवाने पोलीस शिपाई योगेश हिरेमठ आणि पोलीस नाईक राजेश गावकर हे आपली ड्युटी संपवून घरी जात होते. हिरेमठ यांना ही गोष्ट कळताच त्यांनी तात्काळ या चोराचा पाठलाग सुरु केला. यासाठी ते थेट रेल्वे ट्रॅकमध्ये उतरले.

ADVERTISEMENT

यावेळी दोन प्रवाशांनी या चोराला अडवण्याचा प्रयत्नही केला. परंतू या चोराने त्यांनाही धक्का देत पळ काढला. परंतू हिरेमठ यांनी हार मानली नाही, त्यांनीही पाठलाग सुरु ठेवला आणि अखेरीस चोरटा पोलिसांच्या जाळ्यात सापडलाच.

ADVERTISEMENT

ताहिर मुस्तफा सय्यद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचे वय २५ वर्षे आहे. या आरोपीविरुद्ध आणखी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. जीवाची बाजी लावत मोबाईल चोरट्याला पकडण्याऱ्या मुंबई पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.

सख्खा मित्र झाला पक्का वैरी! १०० रूपयांसाठी पाईपने गळा आवळून मित्राला संपवलं

    follow whatsapp

    ADVERTISEMENT