चार महिन्यांच्या बाळाची वडिलांकडून चार लाखांना विक्री, मुंबई पोलिसांनी केली सुटका, 11 जण अटकेत

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई पोलिसांच्या पथकाने एका चार महिन्यांच्या अपहरण झालेल्या बाळाची सुटका केली. या बाळाला त्याच्या कथित वडिलांनी एका मूल नसलेल्या तामिळनाडूतील एका जोडप्याला चार लाखांना विकलं होतं. मुंबई पोलिसांनी याबद्दलची तक्रार येताच आपली सगळी चक्रं फिरवली आणि या प्रकरणा एकूण 11 जणांना अटक केली आहे.

3 जानेवारीला मुंबईतील व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात अन्वरी शेख यांनी तक्रार नोंदवली होती. ज्यामध्ये लस देण्याच्या बहाण्याने आरोपी इब्राहिम शेखने 27 डिसेंबरला तिच्या घरातून बाळाला नेलं मात्र तो परत आलाच नाही. तिने या प्रकरणात अखेर पोलिसांकडे धाव घेतली. बाळाची आई अन्वरी शेख यांच्याकडे बाळाला सोडून गेली होती. आरोपी इब्राहिम आणि बाळाची आई हे दोघे लिव्ह इनमधे राहात होते.

नागपूर: दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या चिमुकल्याची हत्या? मृतदेह सापडला नदीच्या कॅनलमध्ये

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबई पोलिसांच्या झोन टू चे डीसीपी सौरभ त्रिपाठी म्हणाले की, गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही पोलीस निरीक्षक विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकं तयार केली. या पथकांनी आपल्या खबऱ्यांना कामाला लावलं. त्यानंतर त्यांनी इब्राहिम शेखला पकडण्यात य़श मिळवलं. धारावी, नागपाडा, सायन, मालाड, जोगेश्वरी, कल्याण आणि ठाणे या ठिकाणी ही पथकं कार्यरत होती. अर्भक विक्रीमध्ये गुंतलेल्या दोन महिला आणि चार पुरूषांनाही आम्ही अटक केली तेव्हा या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला असंही त्रिपाठी यांनी स्पष्ट केलं.

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा, गळा चिरून केली हत्या

ADVERTISEMENT

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी ही कबुली दिली की बाळाला त्यांनी आधी कर्नाटकला नेलं होतं. त्यानंतर तामिळनाडू येथील सेलम जिल्ह्यात असलेल्या एका गावात नेलं. त्यानंतर आमची एक टीम त्या गावात गेली. तामिळनाडूमधली आणखी दोन ठिकाणीही आम्ही शोध घेतला. अखेर कोईम्बतूरजवळच्या सेलवानपट्टी गावात पोहचून या बाळाची सुटका करण्यात आम्हाला यश आलं. चौकशीत असं समोर आलं की हे बाळ एका मूल नसलेल्या जोडप्याने 4 लाख 80 हजार रूपये देऊन विकत घेतलं होतं अशीही माहिती त्रिपाठी यांनी दिली.

ADVERTISEMENT

तपासादरम्यान असं आढळून आलं की तामिळनाडूतील एका टेक्निकल कंपनीत काम करणाऱ्या जोडप्याला मूल होत नव्हतं. सरोगसीच्या रॅकेटमध्ये सामील असलेल्या डॉक्टरने सांगितलं होतं की एका विशिष्ट रकमेच्या बदल्यात बाळ देण्यास मी तुमची मदत करेन. त्यानंतर डॉक्टर सरोगसी गुंतलेल्या इतर महिलांच्या संपर्कात आले. त्यानंतर यांचा संपर्क इब्राहिम शेख यांच्यापर्यंत पोहचले ज्याने चार महिन्याच्या अर्भकाचं अपहरण केलं. त्यानंतर त्याने हे बाळ या रॅकेटच्या स्वाधीन केलं. इब्राहिम शेखने मी बाळाचा पिता आहे असा दावा केला. अशी माहितीही त्रिपाठी यांनी दिली.

पुण्यात व्याजाचे पैसे न दिल्याने एका व्यक्तीचा सपासप वार करून खून

इब्राहिमने केलेल्या दाव्याची पोलीस पडताळणी करणार असून त्याची डीएनए चाचणी केली जाईल. अर्भकाला बाल कल्याण समितीसमोर हजर केले जाईल आणि बाळासाच्या सुरक्षेसंदर्भातला आणि संगोपनासाठी पुढील निर्णय घेतला जाईल.

पोलिसांनी याप्रकरणी इब्राहिम शेख (32), मोहम्मद उर्फ ​​शेरू खान (39), लक्ष्मी मुर्गेश कौंदर (28), सद्दाम शाह (26), अमजद शेख (38), ताहिरा उर्फ ​​रेश्मा शेख (35), कार्तिक राजेंद्रन (35) या एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. चित्रा कार्तिक (31), तमिळ थंगराज (23), , मूर्ति सामी(36) आणि आनंदकुमार नागराजन(44) यांचा शोध पोलीस घेत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT