Cyclone Gulab : आज मुंबई, पुण्याला मुसळधार पावसाचा इशारा; सहा जिल्ह्यांना अलर्ट जारी

Mumbai Rains : मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार : अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे कोणते?
Cyclone Gulab : आज मुंबई, पुण्याला मुसळधार पावसाचा इशारा; सहा जिल्ह्यांना अलर्ट जारी
मुंबई, पुण्यासह राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.India Today

गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. चक्रीवादळाचं आता कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर झाल्यानं पावसाचा जोर आणखी वाढणार असून, मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर ठाण्यासह सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीप्रमाणमे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाचं रुपांतर आता कमी दाबाच्या पट्ट्यात झालं आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. कमी दाबाच्या राहिलेल्या पट्ट्यामुळे आज मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार

गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबईत आज (१९ सप्टेंबर) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरांत दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून, आज ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून, पावसाचा जोर वाढणार आहे, असं हवामान विभागाबरोबरच मुंबई महापालिकेनंही म्हटलं आहे.

अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे कोणते?

ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतही पावसाची संततधार कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई, पुण्यासह राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
खोपोली : धबधब्यावर भिजणं जिवावर बेतलं, २ महिलांचा मृत्यू

'गुलाब चक्रिवादळाच्या आता राहिलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे 48 तास राज्यावर दिसेल. येत्या 24 तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार व अतिवृष्टीची शक्यता. मुंबई, ठाण्यातही. विदर्भात प्रभाव कमी होईल, असं भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राचे संचालक होसाळीकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मुंबई, पुण्यासह राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Cyclone Gulab : मराठवाड्यात हाहाकार! नद्यांचा रौद्रवतार, धरणं तुडुंब; मदतकार्याला वेग

मराठवाड्यातील पाणीच पाणी

गुलाब चक्रीवादळाचा परिणाम मराठवाड्यात दिसून आले. मराठवाड्यात दोन दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस कोसळत असून, अनेक जिल्ह्यांत पूरपरस्थिती ओढवली आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, जालना औरंगाबाद, परभणी या जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in