Covid 19 : टेन्शन वाढलं आणि रूग्णसंख्याही.. मुंबईत दिवसभरात 20318 रूग्णांची नोंद

मुंबईत दिवसभरात पाच मृत्यूंची नोंद
Covid 19 : टेन्शन वाढलं आणि रूग्णसंख्याही.. मुंबईत दिवसभरात 20318 रूग्णांची नोंद
कोरोना चाचणी(India Today)

वाढती कोरोना रूग्णसंख्या मुंबईचं टेन्शन वाढवते आहे यात काहीही शंका नाही. रोज कोरोना रूग्णांमध्ये भर पडते आहेच. आज दिवसभरात मुंबईत 20318 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात पाच मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 16 हजार 399 मृत्यू झाले आहेत. मुंबईत आत्तापर्यंत कोरोना झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 8 लाख 95 हजार 98 इतकी झाली आहे. आज 1257 रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आज दिवसभरात 6003 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 7 लाख 70 हजार 56 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत दिवसभरात आज दिवसभरात 71 हजार 19 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज ज्या पाच मृत्यूंची नोंद झाली त्यातले दोन रूग्ण पुरूष तर तीन महिला होत्या. एक रूग्ण 40 ते 60 या वयोगटातील होता. तर बाकीचे चार रूग्ण हे 60 वर्षे किंवा त्याच्या वरच्या वयाचे होते.

कोरोना रुग्ण तपासणी
कोरोना रुग्ण तपासणी फोटो-इंडिया टुडे

मुंबईचा रिकव्हरी रेट हा 86 टक्के झाला आहे. 1 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीत ग्रोथ रेट 1.47 टक्के झाला आहे. मुंबईचा डबलिंग रेट 47 दिवसांवर आला आहे. मुंबईतल्या झोपडपट्टी आणि चाळींमधले जे कंटेन्मेंट झोनची संख्या 9 झाली आहे. तर मुंबईत आत्तापर्यंत 120 इमारती सील करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

कोरोना चाचणी
Corona : मुंबईत लॉकडाऊन की मिनी लॉकडाऊन? महापौर किशोरी पेडणेकरांनी दिलं उत्तर

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. मुंबईत शनिवारी 20 हजार 318 रूग्णांची नोंद झाली. शुक्रवारी 20 हजार रूग्ण आढळले होते. त्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू झाली आहे ती लॉकडाऊन लागणार की निर्बंध कठोर होणार याची. याबाबत आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीही मुंबईतील रुग्णसंख्या 20 हजारांच्या पुढे गेली तर लॉकडाउन लागण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. तसेच शुक्रवारी वाढत्या रुग्णसंख्येवरुन महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मिनी लॉकडाउनचा इशारा दिला होता. मात्र आता मुंबईत रुग्णसंख्या वाढत असली तर लॉकडाउन लागणार नसल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in