मुंबईत Corona रूग्णसंख्या सलग तिसऱ्या दिवशी 8 हजारांच्या आत

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 7 हजार 684 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 6 हजार 790 जण बरे झाले आहेत. तर 62 जणांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 6 लाख 1 हजार 590 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आत्तापर्यंत 5 लाख 3 हजार 53 जण कोरोनातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकट्या मुंबईत कोरोनामुळे एकूण 12 हजार 501 जणांचा मृत्यू झाला आहे. आज घडीला मुंबईत 84 हजार 743 सक्रिय रूग्ण आहेत.

21 एप्रिल हा सलग तिसरा दिवस ठरला आहे ज्यादिवशी मुंबईतल्या कोरोना पॉझिटिव्ह केसेस 8 हजारांच्या आत आहेत ही बाब काहीशी समाधानाची म्हटली पाहिजे.

गेल्या सहा दिवसातल्या मुंबईतल्या कोरोना रूग्णसंख्येवर एक नजर

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

20 एप्रिल – 7,294 कोरोना रूग्ण, 35 मृत्यू

19 एप्रिल – 7,381 कोरोना रूग्ण, 57 मृत्यू

ADVERTISEMENT

18 एप्रिल – 8,479 कोरोना रूग्ण, 53 मृत्यू

ADVERTISEMENT

17 एप्रिल – 8,834 कोरोना रूग्ण, 52 मृत्यू

16 एप्रिल – 8,839 कोरोना रूग्ण, 54 मृत्यू

15 एप्रिल – 8,217 कोरोना रूग्ण, 49 मृत्यू

इंडिया टुडेशी बोलताना कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनीही सांगितलं की निर्बंध लादण्यात आले आहेत त्यामुळे कोरोना रूग्णसंख्या कमी होते आहे. पण आपण बेसावध राहणं चूक आहे. येत्या काही दिवसांमध्ये कोरोना रूग्ण कमी होतील यासाठीच लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

‘येत्या 15 दिवसात फक्त मुंबईतल्याच नाही तर राज्यातल्याही केसेस कमी होतील. लोकांना प्रादुर्भावापासून रोखणं हे खूप आवश्यक आहे त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत’ असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. अशा वेळेस कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आणणं याकडेच आम्ही लक्ष केंद्रीत करतो आहे असंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT