Crime: कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन सख्ख्या भावांचा खून

कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरुन नांदेडमध्ये दोन सख्ख्या भावांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
murder of two brothers for trivial reason of dumping garbage shocking incident in nanded
murder of two brothers for trivial reason of dumping garbage shocking incident in nanded

कुँवरचंद मंडले, नांदेड: घरासमोर कचरा टाकल्याच्या कारणावरून 2 सख्या भावांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात घडलीये. नांदेड शहरातील देगावचाळ भागात हा थरार काल (1 मार्च) रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडला.

घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून भावकीमध्ये वाद झाला. याच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी भांडणात 35 वर्षीय प्रफुल्ल राजभोज आणि 33 वर्षीय संतोष राजभोज या दोघा भावांवर आरोपींनी चाकूने गंभीर वार केले. यात प्रफुल्ल आणि संतोष दोघांचाही मृत्यू झाला.

तर या घटनेत अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समजते आहे. या प्रकरणी 7 आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर याच प्रकरणातीस आणखी 4 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

murder of two brothers for trivial reason of dumping garbage shocking incident in nanded
ऑनर किलिंग! पतीने केली पत्नीची हत्या, मुंडकं रस्त्यावर मिरवलं; व्हायरल व्हीडिओमुळे खळबळ

मोठ्या भावाने दिव्यांग भावाची गळा दाबून केली हत्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आईने गाडी घेण्यासाठी पैसे न दिल्यामुळे रागातून मोठ्या भावाने आपल्या धाकट्या दिव्यांग भावाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. गडचिरोली जिल्ह्यात आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक गुन्हा घडला होता. हेमंत डोये (वय २३) असं आरोपीचं नाव आहे.


गेल्या काही दिवसांपासून आरोपी हेमंतचं आपल्या आईशी भांडण होत होतं. मला गाडी घेण्यासाठी पैसे दे यावरुन अनेकदा दोघांमध्ये भांडणं व्हायची. परंतू हेमंतचा छोटा भाऊ भुवन हा दिव्यांग असल्यामुळे त्याच्या उपचारासाठी आई छगनबाई डोये यांनी पैसे वाचवून ठेवले होते. हे सर्व पैसे मुलाच्या उपचारासाठी लागणार असल्यामुळे छगनबाई हेमंतला पैसे देण्यास कायम नकार द्यायच्या.

आपल्या भावाच्या वैद्यकीय उपचारासाठी पैसे लागतात म्हणून आपल्याला पैसे मिळत नाहीत अशी भावना हेमंतच्या मनात तयार झाली होती. हाच राग मनात ठेवून हेमंतने पुन्हा आईशी भांडणं केलं. या भांडणात हेमंतने आईला मी तुला मारुन टाकतो अशी धमकी दिली. ज्यामुळे घाबरलेल्या छगनबाई या शेजारी झोपायला गेल्या. याच संधीचा फायदा घेत हेमंतने आपल्या लहान भावाची रात्री गळा दाबून हत्या केली.

हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर आई छगनबाईने यांनी तात्काळ आपल्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ज्यानंतर पोलिसांनी हेमंतला अटक केली. न्यायालयाने हेमंतला मॅजिस्ट्रेट कोठडी सुनावली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in