अखेर महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला. गेल्या वर्षभरापासून नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावावरून चर्चा होतेय. या सगळ्या चर्चांना आज नाना पटोले यांच्या नावाच्या घोषणेनं पूर्णविराम मिळाला.
दिल्लीतून काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धीपत्रक काढून ही घोषणा केली. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा झालीय.
INC COMMUNIQUE
Important Notification regarding appointment of Maharashtra PCC President, Working Presidents, Parliamentary Board of Maharashtra PCC and Strategy Screening and Coordination Committee pic.twitter.com/bkQSendfgL
— INC Sandesh (@INCSandesh) February 5, 2021
नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करताना काँग्रेसने प्रदेश कार्यकारिणीचीही घोषणा केलीय. यात पटोले यांच्या मदतीसाठी ६ कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्त करण्यात आलीय. हे सहा अध्यक्ष वेगवेगळ्या प्रदेशातून येतात.
यामध्ये विदर्भातून शिवाजीराव मोघे, मराठवाड्यातून बस्वराज पाटील मुरुमकर, पश्चिम महाराष्ट्रातून प्रणिती शिंदे, उत्तर महाराष्ट्रातून कुणाल पाटील यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलंय.
तसंच मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील दोघांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलीय. मुंबईतून माजी मंत्री नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी मिळालीय.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी @NANA_PATOLE साहेब यांची तर शिवाजीराव मोघे जी, बसवराज पाटील जी, @naseemkhaninc जी, @Kunal_R_Patil जी, @Chandore_INC जी व @ShindePraniti ताई यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 5, 2021
अशी आहे काँग्रेसची नवी प्रदेश कार्यकारिणी
प्रदेशाध्यक्ष – नाना पटोले
कार्यकारी अध्यक्ष
1. शिवाजीराव मोघे
2. बसवराज पाटील
3. मोहम्मद आरीफ नसीम खान
4. कुणाल रोहिदास पाटील
5. चंद्रकांत हांडोरे
6. प्रणिती सुशीलकुमार शिंदे
उपाध्यक्ष
1. शिरीष मधुकरराव चौधरी
2. रमेश बागवे
3. हुसेन दलवाई
4. मोहन जोशी
5. रणजित कांबळे
6. कैलास गोरंट्याल
7. बी. जी. नगराळे
8. शरद आहेर
9. एम. एम शेख
10. माणिक जगताप