Happy Naraka Chaturdashi 2021: नरक चतुर्दशीनिमित्त Facebook-Whatsapp मेसेज, Wishes आणि शुभेच्छा

Whatsapp Quotes on Naraka Chaturdashi 2021: यंदा दिवाळीतील तिसरा महत्त्वाचा समजला जाणारा सण नरक चतुर्दशी हा 4 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. याचनिमित्ताने द्या मित्र-मंडळींना खास शुभेच्छा मेसेज.
Happy Naraka Chaturdashi 2021: नरक चतुर्दशीनिमित्त  Facebook-Whatsapp मेसेज, Wishes आणि शुभेच्छा
naraka chaturdashi 2021 whatsapp facebook status wishes images quotes photos greeting message in marathi

Naraka Chaturdashi 2021 whatsapp Marathi wishes and Messages: दिवाळी (Diwali) सणामधील सर्वात महत्त्वाचा मुहूर्त हा नरक चतुर्दशीचाचा समजला जातो. याच दिवसापासून दिवाळी सणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. यंदा नरक चतुर्दशी (Naraka Chaturdashi) 4 नोव्हेंबरला आहे. याच दिवशी लक्ष्मीपूजन देखील असणार आहे.

दिवाळी सणातील नरक चतुर्दशीच्या दिवसाला खूपच महत्त्व आहे. दरवर्षी अनेक ठिकाणी दिवाळ पहाटचं आयोजन केलं जातं. पण कोरोना संकटामुळे यंदाही दिवाळी पहाट किंवा तत्सम कार्यक्रम होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जरी दिवाळी पहाट साजरी केली जाणार नसेल तरी आपण आपल्या मित्रमंडळींना नरक चतुर्दशी आणि दिवाळी पहाटच्या (Diwali Pahat) शुभेच्छा ऑनलाइन नक्कीच देऊ शकता.

आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीलाच 'नरक चतुर्दशी' असं म्हणतात. पौराणिक कथेनुसार, नरकासूर हा असूर एका होता जो अनेक दिवसांपासून साधू-संतांना सतत त्रास द्यायचा. जेव्हा नरकासुराबाबतची ही तक्रार भगवान श्रीकृष्णापर्यंत पोहचली तेव्हा त्याने सत्यभामेसह या नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याचा सर्वनाश केला. दरम्यान, ज्या दिवशी कृष्णाने नराकसुराचा वध केला तो दिवस आश्विन वद्य चतुर्दशीचा होता.

तेव्हापासूनच या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणून ओळखले जाते. याच दिवशी सूर्योदयापूर्वी सर्व जण अभ्यंगस्नान करुन कारटे फोडून प्रतिकात्मक नरकासुराचा वधही करतात आणि नंतर गोड आणि फराळाचा आस्वाद घेतात. इथूनच दिवाळी सण खऱ्या अर्थाने साजरा केला जातो.

दिवाळी सणाचं महत्त्व मोठं आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने अनेक शुभकार्य देखील पार पडतात. अशा या सणाला अनेक जण खास शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी देखील जातात. पण सध्याच्या काळात हे अनेकांना शक्य होतं नाही. म्हणून अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातूनच शुभेच्छा पाठवतात.

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

दिवाळीची नवी पहाट घेऊन आली सुखाची नवी आशा, ुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन जगी उजळू दे तेजाची दिशा

नरक चतुर्दशी आणि दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

समईच्या शुभ्र कळ्या लक्ष्मीपूजनी तळपती, दिवाळीच्या पणतीने, दाही दिशा झळकती!

नरक चतुर्दशी आणि दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

अज्ञानरुपी अंधकारा पासून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा हा दिव्यांचा उत्सव. कोरोनारुपी संकटाचा, दारिद्र्याचा, असहिष्णूतेचा, द्वेषाचा नरकासुर नष्ट होवो.

नरक चतुर्दशी आणि दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

नरक चतुर्दशीच्या दिनी आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन आपले आयुष्य तेजोमय होवो.

नरक चतुर्दशी आणि दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

(फोटो सौजन्य: Twitter)

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट

नरक चतुर्दशी आणि दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

naraka chaturdashi 2021 whatsapp  facebook status wishes images quotes photos greeting message in marathi
Happy Dhanteras 2021: धनत्रयोदशीनिमित्त Facebook-Whatsapp मेसेज, Wishes आणि शुभेच्छा

सोशल मीडियामुळे आता आपल्याला शुभेच्छा पाठविण्यसाठी WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम यासारखे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. याचद्वारे आपण Messages आणि Wishes पाठवू शकतात. यासाठी काही खास मराठी शुभेच्छा असलेले कार्ड (Naraka Chaturdashi 2021 wishes and Quotes) आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छा मेसेज आपण एकमेकांना पाठवू शकतात.

नरक चतुर्दशीच्या सणानिमित्त 'मुंबई तक'कडून देखील आपल्याला मन:पूर्वक शुभेच्छा!

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in