'नितेश राणेंना अटक करण्याची शक्यता'; नारायण राणे महाविकास आघाडीवर भडकले

नितेश राणेंना अटक होणार असल्याच्या वृत्तावर नारायण राणेंचा आघाडी सरकारवर प्रहार
'नितेश राणेंना अटक करण्याची शक्यता'; नारायण राणे महाविकास आघाडीवर भडकले
केंद्रीय मंत्री नारायण राणे.(फाइल फोटो, सौजन्य - Facebook)

जिल्हा बँक निवडणुकीमुळे सिंधुदुर्गातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडली असून, या प्रकरणात आता आमदार नितेश राणे यांना अटक केली जाणार असल्याचंही बोललं जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही अशी शंका व्यक्त केली असून, त्यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.

नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नितेश राणेंना अटक होण्याबद्दलच्या वृत्तावर भाष्य केलं. राणे म्हणाले, 'कसली अटक? काय केलंय नितेश राणेंनी? सत्तारुढ लोकांचा जिल्हा बँकेत पराभव होईल म्हणून सुडाच्या भावनेतून हे सुरू आहे. केस दाखल केलीये की नाही, मला माहिती नाही. काल मी जिल्ह्यात होतो, पण तोपर्यंत काही झालेलं नव्हतं. हे सुडाच्या राजकारणातून चाललं आहे', असं राणे म्हणाले.

नितेश राणे अज्ञातवासात गेल्याच्या वृत्तावर बोलताना राणे म्हणाले, 'अज्ञातवासात नाहीये. नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे. अज्ञातवासात जायची आम्हाला काही गरज नाही. ते आमदार आहेत. त्यामुळे अज्ञातवासात वगैरे काही नाही. अटक करण्याच्या बातम्या दिल्या जात असतील, तर आम्ही न्यायालयात तर जाणारच', असं राणे यांनी म्हटलं आहे.

'काही दिवसांपूर्वी कणकवलीमध्ये एक घटना घडली. एका सज्जन कार्यकर्त्याला कुणीतरी मारहाण केल्याची बातमी आली. त्या प्रकरणातील आरोपी पकडण्यात आले. तरीही भाजपचे आमदार नितेश राणे, जि.प.चे माजी अध्यक्ष संजय सावंत यांना वारंवार पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी करून अटक करण्याची शक्यता दिसत आहे. हे सुडाचं आणि आकसाचं राजकारण आहे.

'पोलीस बळाचा वापर करून सत्तेचा दुरूपयोग केला जात आहे. सिंधुदुर्गातील जनता या दडपशाहीला जुमाणणारी नाही. ही निवडणूक भाजप जिंकणार. जिल्हा बँकेत आमची सत्ता येणार याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. सरकारचं ऐकून जर दडपशाही सुरूच ठेवली, स्वस्थ बसणार नाही. केंद्रातही आमची सत्ता आहे. मी केंद्रात मंत्री आहे', अशा शब्दात राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर नारायण राणे यांनी निशाणा साधला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in