नारायण राणेंसह नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या; दिशा सालियन प्रकरणी पोलिसांचं समन्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केलेल्या आरोपांमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या मागे चौकशीचा फेरा सुरू होणार असल्याचं दिसतं आहे. दिशाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी नारायण राणेंसह नितेश राणेंनाही समन्स बजावलं आहे.

दिशा सालियनची बलात्कार हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आता नारायण राणेंसह नितेश राणे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नितेश राणे यांना आज (३ मार्च) सकाळी ११ वाजता पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.

त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जबाब नोंदवण्यासाठी गुरुवारी (४ मार्च) सकाळी ११ वाजता मालवणी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आलं आहे. मालवणी पोलिसांनी मयत दिशा सालियनच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला असून, आता नारायण राणे आणि नितेश राणेंची चौकशी केली जाणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राणेंवर कोणती कलमं लावण्यात आलीये?

कलम 500 – बदनामी संदर्भातील कलम आहे. दुसऱ्याची बदनामी करणाऱ्याला दोन वर्षांपर्यंत तुरूंगवास किंवा दंड किंवा गरज भासल्यास दोन्ही शिक्षा, अशी तरतूद कलमान्वये होते.

ADVERTISEMENT

कलम 509 – कोणत्याही स्त्रीचं प्रतिष्ठा हनन करणं. त्या इराद्याने तसे शब्द वापरणं, कोणताही आवाज, हावभाव करणं किंवा एखादी वस्तू दाखवून त्या स्त्रीचा अपमान करणं. स्त्रीचा अपमान होईल या हेतूने तसे शब्द वापरणं. स्त्रीच्या गोपनीयतेचा भंग यासाठीचं हे कलम आहे. यामध्येही कठोर शिक्षेची तरतूद आहे.

ADVERTISEMENT

दिशा सॅलिअन प्रकरणी नारायण राणे यांना कुटुंबियांनी काय दिला इशारा?

कलम 67 – अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत किंवा तो पाठवल्यासंदर्भातील हे कलम आहे. जी कुणी व्यक्ती सर्व संबंध आणि परिस्थिती विचारात घेऊन अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रसिद्ध करतील किंवा प्रसिद्ध होईल अशी व्यवस्था करतील अशा व्यक्तीला त्या अपराधासाठी तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद या कलमात आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनयिम 2000 अन्वये या कलमात सुधारणा करण्यात आली आहे. तसंच यासाठी पाच लाख रूपये दंडाची तरतूदही आहे. जास्त गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल तर दंडाची रक्कम १० लाख आणि शिक्षा दहा वर्षांपर्यंत होईल असंही यामध्ये म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT