मुख्यमंत्री ठाकरे कानात काय बोलले ते राणेंनी आता सांगितलं, म्हणाले.. 'मग मला चीडच आली म्हटलं आता..'

Narayan Rane: चिपी विमानतळ उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कानात काय बोलले आणि पुढे नेमकं काय झालं याचा किस्साच नारायण राणेंनी शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत सांगितला.
मुख्यमंत्री ठाकरे कानात काय बोलले ते राणेंनी आता सांगितलं, म्हणाले.. 'मग मला चीडच आली म्हटलं आता..'
narayan rane mumbai press conference chipi airport speech anecdote CM uddhav thackeray taunt annoyed

मुंबई: भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत शुक्रवारी (5 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आणि विशेषत: शिवसेनेवर प्रचंड टीका केली. यावेळी दादरा-नगर हवेलीमधील भाजपचा पराभव ते आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणी प्रत्येक मुद्द्यावरुन त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. मात्र, पत्रकार परिषदेच्या शेवटी त्यांनी चिपी विमानतळ उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कानात काय बोलले आणि पुढे नेमकं काय झालं याचा किस्साच सांगितला.

सिंधुदुर्गमधील बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचं उद्घाटन हे काही दिवसांपूर्वीच पार पडलं. दरम्यान, विमानतळाच्या उद्घाटनापूर्वीच राणे आणि शिवसेना यांच्यात अनेक दिवसांपासून श्रेयवादाची लढाई सुरु होती. दरम्यान, जेव्हा विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकत्र आले तेव्हा नेमकं काय होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अपेक्षेप्रमाणे दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर त्यावेळी अनेक शाब्दिक वार केले होते.

चिपी विमानतळ उद्घाटन सोहळ्यातील फोटो
चिपी विमानतळ उद्घाटन सोहळ्यातील फोटो

दरम्यान, याच कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंच्या कानात काही तरी सांगितल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं होतं. त्यावरुन राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चाही सुरु होत्या. दरम्यान, आज झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांना पत्रकाराने विचारलं की, 'चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री तुमच्या कानात काही तरी बोलले होते. ते नेमकं काय बोलले होते?'

याच प्रश्नावर नारायण राणेंनी तेव्हा नेमका काय किस्सा घडला होता तेच सविस्तरपणे सांगितलं. आपण त्यावेळी आक्रमक भाषण का केलं हेच यावेळी राणेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरे अंस काय म्हणाले होते की ज्यामुळे राणे चिडले.. वाचा नारायण राणेंनी सांगितलेला तो किस्सा जसाच्या तसा..

पत्रकार: 'चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री तुमच्या कानात काही तरी बोलले होते. ते नेमकं काय बोलले होते?'

नारायण राणे: 'नाही.. एवढ्या जवळ येऊन काय बोलले नव्हते. ते काय माझ्या कानाजवळ येऊ शकत नाही. ते तिकडे होते, मी इथे होते. म्हणून मला ऐकायला आलं नाही. त्यांनी मला विचारलं की, भांडी आणली का? मला भांडी काय कळलं नाही मला.. मी म्हटलं काय बोललात? म्हणून मी जवळ गेलो. मी कितीही जवळ जाऊ शकतो त्यांच्या.'

'मी त्यांना म्हटलं की, काय बोललात तुम्ही? ते म्हणाले, नाही.. भांडी फोडणार आहात ना.. मग भांडी आणलीत की नाही? हा मग मी म्हटलं आता भांडी फोडणार.. सांगितलं आता फोडणार.. मला चीडच आली म्हटलं आता भांडी फोडणार.. नंतर आवाज बंद झाला. परत स्टेजवरुन उतरेपर्यंत माझ्याकडे पाहिलं नाही त्यांनी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाला हा कलंक आहे.' असं म्हणत नारायण राणेंनी त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं.

चिपी विमानतळ उद्घाटन सोहळ्यातील फोटो
चिपी विमानतळ उद्घाटन सोहळ्यातील फोटो

चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळावेळी राणेंनी नेमकं काय भाषण केलं होतं?

'या कार्यक्रमाचा मला खूप आनंद होतो आहे. मात्र इच्छा नसतानाही मला राजकारण या कार्यक्रमात आणावं लागतं आहे. चिपी विमानतळ व्हावं ही माझी इच्छा होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनी पाठवलं. त्या जिल्ह्याचा काहीही विकास झाला नव्हता. तो विकास करण्यापासून आता विमानतळाच्या निर्मितीसाठी आपण झटलो.'

'मी उद्धव ठाकरेंना एक विनंती करू इच्छितो. त्यांनी हे फोटो बघावे, आम्हाला विमानतळ नको हे म्हणणाऱ्या आंदोलकांचे फोटो आहेत. 2009 मध्ये हे आंदोलन कुणी केलं होतं ते बघा.'

चिपी विमानतळ उद्घाटन सोहळ्यात भाषण करताना नारायण राणे.
चिपी विमानतळ उद्घाटन सोहळ्यात भाषण करताना नारायण राणे.

'शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी त्यावेळी आंदोलन केलं आणि आता या कामाचं श्रेय घेऊ पाहात आहेत. विनायक राऊत मला पेढा द्यायला आले तेव्हा मी अर्धा पेढा घेतला मी त्यांना म्हणालो या पेढ्याचा गुणधर्म गोड आहे तो आत्मसात करा आणि बोलायचं तेव्हा हसत बोला.'

'1990 ला बाळासाहेब ठाकरेंनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. त्यानंतर मी या जिल्ह्याचा विकास केला. उद्धवजी तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की, बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेतून मी विकासाचं काम केलं आहे. कोणतंही राजकारण करू नये असं मला वाटत होतं, सिंधुदुर्गाच्या चिपी विमानतळावरून विमान उडताना पाहावं आणि आनंद साजरा करावा असंच मला वाटत होतं.'

'मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्रीसाहेब माझ्या कानात काहीतरी बोलले मात्र मला ते ऐकू गेलं नाही एक शब्द कानावर पडला... असो..सिंधुदुर्गाला आर्थिक समृद्धी यावी असा माझा मानस होता.'

narayan rane mumbai press conference chipi airport speech anecdote CM uddhav thackeray taunt annoyed
टिंगू-मिंगू लागलेत बढाया मारायला ! चिपी विमातळाच्या उद्घाटनावरुन Shivsena-BJP मध्ये जुंपली

'तुम्ही समजता तशी परिस्थिती आज नाही. तेव्हा काही गोष्टी होत्या. सन्मानीय आदित्य ठाकरेंनी इथला अभ्यास करावा, 481 पानांचा रिपोर्ट वाचावा. धरणाला एक रूपया अद्याप दिलेला नाही. काय विकास झाला? या एअरपोर्टलाही पाणी नाही. सबस्टेशन नाही, 34 कोटी नाही. चिपी विमानतळावर उतरल्यावर लोकांनी रस्त्यावरचे खड्डे बघायचे का? हा देसाई कंपनीचा प्रायव्हेट लिमिटेड कार्यक्रम आहे का?'

'मला खोटं बोललेलं आवडत नाही असं बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. मी जे काही केलं त्याचं श्रेय मला नको, कारण जनतेला हे ठाऊक आहे की नेमकी कुणी कामं केली आहेत.' असं भाषण करत राणेंनी तेव्हा देखील शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in