नरेंद्र गिरी महाराज मृत्यू प्रकरण : मुख्य आरोपी आनंद गिरीला अटक; तपास 'एसआयटी'कडे

Narendra Giri Death case : नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटमध्ये अनेकांची नावं : आनंद गिरीला हरिद्वारमध्ये घेतलं होतं ताब्यात
नरेंद्र गिरी महाराज मृत्यू प्रकरण : मुख्य आरोपी आनंद गिरीला अटक; तपास 'एसआयटी'कडे
मुख्य आरोपी आनंद गिरी याला पोलिसांनी केलं अटक. (Photo: PTI)

अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि निरंजनी अखाड्याचे सचिव महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या संशयास्पद मृत्यूने देशभरात खळबळ उडाली आहे. महंत नरेंद्र गिरी महाराज प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या आनंद गिरी याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सोमवारी रात्री हरिद्वामधून ताब्यात घेण्यात आलं होतं.

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी प्रयागराजमध्ये बोलताना ही माहिती दिली. महंत नरेंद्र गिरी महाराज मृत्यू प्रकरणात मुख्य आरोपी आनंद गिरी याला अटक करण्यात आली असून, घटनेच्या चौकशीसाठी एसआयटीही नेमण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा मृतदेह प्रयागराज येथील बाघंबरी मठातील खोलीत त्यांचा मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. मात्र, या घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना एक सात पानाची सुसाईड नोट मिळाली होती. ज्यात काही जणांकडून त्रास होत असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

मुख्य आरोपी आनंद गिरी याला पोलिसांनी केलं अटक.
अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, काय आहे सुसाईड नोटमध्ये?

महंत नरेंद्र गिरी यांच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या या सुसाईड नोटमध्ये अनेक लोकांची नावं आहेत. या लोकांकडून त्यांना त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यात त्यांचा शिष्य आनंद गिरी यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर लगेच सोमवारी रात्री उत्तर प्रदेशातील सहारनपूर पोलिसांसह एसओटीचा समावेश असलेलं एक पथक हरिद्वारमधील आश्रमात पोहोचलं. तिथे जवळपास दीड तास आनंद गिरीची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आलं.

मुख्य आरोपी आनंद गिरी याला पोलिसांनी केलं अटक.
Narendra Giri यांच्या मृत्यूवर प्रज्ञा सिंह यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या पालघर आणि या घटनेचं कनेक्शन

अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी आणि त्यांचा शिष्य आनंद गिरी यांच्या बऱ्याच काळापासून वाद सुरू होते. नंतर दोघांमध्ये समेट झाला. तेव्हा हरिद्वारवरून प्रयागराजला येऊन आनंद गिरीने नरेंद्र गिरी यांच्या पायावर डोकं माफी मागितली होती.

Related Stories

No stories found.