'मुलांनी मित्र गमावले, मला ड्रग पेडलरची बायको म्हणून हिणवलं गेलं'

नवाब मलिकांची मुलगी निलोफरने पत्रातून मांडली व्यथा
'मुलांनी मित्र गमावले, मला ड्रग पेडलरची बायको म्हणून हिणवलं गेलं'

आर्यन खान प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरुन सध्या बराच गदारोळ सुरु आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. या आरोपसत्रामुळे आर्यन खानसह ५ प्रमुख प्रकरणांमधून समीर वानखेडेंचे चौकशीचे अधिकार काढून घेण्यात आले.

या गदारोळात नवाब मलिक यांची मुलगी निलोफर खान हिने आपला पती समीर खानवर NCB ने केलेल्या कारवाईच्यादरम्यानची आपबिती एका पत्रातून मांडली आहे. NCB च्या कारवाईमुळे आपल्याला आणि आपल्या परिवाराला काय-काय भोगावं लागलं हे निलोफरने पत्रात लिहीलं आहे.

समीर वानखेडे यांना या प्रकरणातून हटवल्यानंतरही निलोफर मलिक यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केलं होतं. ‘जनतेला गृहीत धरले जाऊ नये. जे अपराधी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि इतर लोकांना आवाहन करते की त्यांनी पुढे यावं आणि आमच्याबरोबर अन्यायाविरुद्ध लढा द्यावा’ असं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा एक ट्विट करत निलोफर मलिक यांनी सोशल मीडियावर खुले पत्र शेअर केले आहे.

या पत्रात निलोफर यांनी NCB च्या कारवाईमुळे आपल्याला ड्रग पेडलरची बायको म्हणून हिणवलं गेलं, माझ्या मुलांचे मित्र तुटले अशा वेदना मांडल्या आहेत. हे पत्र शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी ‘एका निष्पापाच्या पत्नीचे खुले पत्र’ असं म्हणत ‘सुरुवात’ असं लिहिलं आहे.

दरम्यान समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणाच चौकशीचे अधिकार काढल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्वाची प्रतिक्रीया दिली आहे.

काय म्हणाले आहेत समीर वानखेडे?

मी मुंबई एनसीबीचा झोनल डायरेक्टर आहे, यापुढेही असणार आहे. माझ्याकडून हे पद काढून घेण्यात आलेलं नाही. आर्यन खान प्रकरणी माझ्यावर नवाब मलिक यांनी आरोप केले होते. त्यामुळे नवाब मलिकांनी केलेल्या आऱोपांची आणि आर्यन खान प्रकऱणाची चौकशी SIT कडून चौकशी करावी असं मीदेखील सुचवलं होतं. त्यामुळे आता हे प्रकरण माझ्याकडून काढून घेतलं हे एक प्रकारे बरंच झालं. मी ड्रग्ज प्रकरणात ज्या काही खास मोहिमा असतील त्या राबवत राहणार. मला दिल्लीत बोलवण्यात आलेलं नाही. मात्र मला या केसमधून वेगळं करण्यासाठीची ऑर्डर समोर मला मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in