'नवाब मलिक कोर्टाला चुकीची कागदपत्रं सादर करून समीर वानखेडेंबाबत दिशाभूल करत आहेत'

जाणून घ्या क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंच्या बाजूने असलेल्या लोकांनी काय म्हटलं आहे?
'नवाब मलिक कोर्टाला चुकीची कागदपत्रं सादर करून समीर वानखेडेंबाबत दिशाभूल करत आहेत'
mumbai cruise drugs case minister nawab malik vs ncb sameer wankhede allegations police crime

नवाब मलिक कोर्टाला चुकीची कागदपत्रं सादर करत समीर वानखेडेंबाबत दिशाभूल करत आहेत. समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी आज संध्याकाळी समीर वानखेडे यांचा जन्मदाखला सार्वजनिक केला. बृहन्मुंबई महापालिकेने हा दाखला दिला आहे. यावर महापालिकेचा शिक्का आहे. तसंच यामध्ये समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे असं लिहिण्यात आलं आहे हे त्यांनी दाखवलं.

समीर वानखेडे यांचं मूळ ओरिजनल बर्थ सर्टिफिकेट अर्थात जन्म दाखला सादर केला. त्यावर समीर ज्ञानदेव वानखेडे असंच नाव आहे असं त्यांनी सांगितलं. नवाब मलिक हे करत असलेले आरोप बिनपबुडाचे आहेत असंही क्रांती म्हणाली.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक...
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक...nawab malik/twitter

आणखी काय म्हणाल्या क्रांती रेडकर?

इंडिया टीव्हीशी बोलताना क्रांती म्हणाली की, 'महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक खरं बोलत नाही. ते काहीतरी ट्रिक्स पुन्हा पुन्हा वापरत आहेत. मात्र त्यांचे सगळे आरोप खोडून काढण्यासाठी आमच्याकडे खरी कागदपत्रं आहेत. जर ते एक पाऊल उचलतात तर आम्हीही त्यांना उत्तर देऊ शकतो.' दरम्यान या सगळ्या प्रकरणावर समीर वानखेडेंनी बोलण्यास किंवा कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

नवाब मलिक यांनी हा आरोप केला आहे की समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांनी खोटी कागदपत्रं आणि खोटी प्रमाणपत्रं सादर करून सरकारी नोकरी मिळवली. आपण एस.सी आहोत हे त्यांनी सादर केलं आहे. त्या कोट्यातून नोकरी मिळवली मात्र ते जन्माने मुस्लिम आहेत. त्यांच्या वडिलांचे नावही ज्ञानेश्वर नसून दाऊद वानखेडे आहे. समीर दाऊद वानखेडे असाच उल्लेख नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केला होता.

mumbai cruise drugs case minister nawab malik vs ncb sameer wankhede allegations police crime
Drugs Case: समीर वानखेडे आणि मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंमध्ये नेमकी काय झाली चर्चा?

समीर वानखेडेंच्या बाजूने असलेले लोक काय म्हणत आहेत?

समीर वानखेडेंच्या बाजूने असलेले लोक हे म्हणत आहेत की नवाब मलिक त्यांच्या पदाचा गैरवापर करत आहेत. आपल्या पदाचा गैरवापर करून ते मुंबई महापालिका आयुक्तांवर कागदपत्रं देण्यासाठी दबाव टाकत आहेत. एवढंच नाही तर या सगळ्यांनी असाही आरोप केला आहे की मुंबई पोलीस समीर वानखेडेंच्या ज्या शाळेत शिकले तिथे गेले होते. तिथे त्यांनी शाळेतील कर्मचाऱ्यांवर कागदपत्रं देण्यासाठी दबाव टाकला. नवाब मलिकांकडे ही कागदपत्रं तातडीने कशी मिळाली? याबाबतही समीर वानखेडेंच्या बाजूने असणाऱ्या लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

इंडिया टुडेने नवाब मलिकचे दावे खरे आहेत का? या प्रश्नावर त्यांच्या बाजूच्या लोकांनी सांगितले की, समीर वानखेडे यांच्या आईच्या आधीच्या प्रमाणपत्रांमध्ये काही चुका झाल्या होत्या, पण ते ८-९ वर्षांचे असताना त्या दुरुस्त करण्यात आल्या. ते म्हणतात की त्यांनी जुने प्रमाणपत्र घेऊन कोर्टात दाद मागण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी सुधारित प्रमाणपत्रं घेतलेली नाहीत असंही या सगळ्यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in