'नवाब मलिक म्हणजे मुंबईचे कचरा किंग' 100 कोटींचा अब्रू नुकसानाची दावा करणार-मोहित कंबोज

मोहित कंबोज यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न
'नवाब मलिक म्हणजे मुंबईचे कचरा किंग' 100 कोटींचा अब्रू नुकसानाची दावा करणार-मोहित कंबोज

नवाब मलिक म्हणजे मुंबईचे कचरा किंग आहेत. त्यांनी माझ्या विरोधात लावलेले सगळे आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. मी त्यांच्याविरोधात १०० कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे असं म्हणन मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांना कठोर शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. मी भाजपचा कार्यकर्ता आहे असं त्यांनी सांगितलं मात्र मी भाजपमध्ये गेल्या दीड वर्षापासून सक्रिय नाही असंही मोहित यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक हे कारण नसताना NCB आणि भाजपचा संबंध जोडून बदनामी करू पाहात आहेत. नवाब मलिक यांनी एनसीबीच्या प्रामाणिक अधिकाऱ्यांवरही खोटे आरोप केले आहेत. नवाब मलिक यांचा जावई समीर खान याच्यावर NCB ने कारवाई केली त्यामुळेच नवाब मलिक हे NCB च्या मागे हात धुवून लागले आहेत. विनाकारण आरोप करत सुटले आहेत असंही मोहित कंबोजने म्हटलं आहे. हे आरोप करून ते आपल्या जावयाची पाठराखण करू पाहात आहेत असंही मोहीत कंबोज यांनी म्हटलं आहे.

'नवाब मलिक म्हणजे मुंबईचे कचरा किंग' 100 कोटींचा अब्रू नुकसानाची दावा करणार-मोहित कंबोज
NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं सगळ्यांना माहित आहे-फडणवीस

ऋषभ सचदेवा हा माझा मेहुणा आहे. त्याला एनसीबीने कार्यालयात नेलं होतं. त्याने एनसीबीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केलं. तो त्यांना दोषी आढळला नाही त्यामुळे त्याला सोडून देण्यात आलं. मला माझ्या मेहुण्याचा अभिमान आहे. नवाब मलिक यांनी त्याच्यावर आणि माझ्यावर कुठल्या आधारे आरोप केले आहेत? मी NCB कार्यालयात फोन केला होता याचा काय पुरावा नवाब मलिक यांच्याकडे आहे? ज्यावेळी NCB ने छापा मारला तेव्हा 20-25 लोक आर्यन खानच्या बाजूला उभे होते. त्यावेळी ते ऋषभलाही सोबत घेऊन गेले. त्याचा या प्रकरणात काय सहभाग होता ते विचारण्यात आलं. त्याची उत्तरं समाधाकारकपणे ऋषभने दिली. त्यांना वावगं असं काहीही न आढळल्याने त्यांनी ऋषभला सोडून दिलं. यात चुकीचं काय घडलं आहे? असाही प्रश्न मोहित यांनी उपस्थित केला.

ऋषभ सचदेवाकडे ड्रग्ज होते याचा काय पुरावा नवाब मलिकांजवळ आहे? मी त्याची मदत केली याचा काय पुरावा मलिक यांच्यापाशी आहे? मला हे देखील विचारायचं आहे की सचिन वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात आत्तासारखी आक्रमक भूमिका नवाब मलिक यांनी का घेतली नाही? मी आणि माझे कुटुंबीय कुठेही पळून चाललो नाही. आम्हाला चौकशीसाठी बोलावलं तर आम्ही जरूर जाऊ. नवाब मलिक हे कचार किंग आहेत मी त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा 100 कोटींचा दावा करणार आहे असंही मोहित कंबोज यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.