Drugs Case : नीरज गुंडेंचे उद्धव ठाकरेंशीही चांगले संबंध?; नवाब मलिक म्हणाले...

नवाब मलिक यांनी नीरज गुंडे-देवेंद्र फडणवीसांबद्दल केले धक्कादायक आरोप
Drugs Case : नीरज गुंडेंचे उद्धव ठाकरेंशीही चांगले संबंध?; नवाब मलिक म्हणाले...
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांचा ड्रग्ज पेडलरशी कनेक्शन असल्याचा आरोप करत नीरज गुंडेंचा (neeraj gunde) उल्लेख केला. नीरज गुंडे देवेंद्र फडणवीसांचा दूत असल्याचंही मलिक म्हणाले असून, नीरज गुंडे आणि उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यातील संबंधाबाबत विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन जयदीप राणा आणि नीरज गुंडे यांच्याबद्दल माहिती दिली. फडणवीसाच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू आहे, असं मलिक म्हणाले. यावेळी त्यांना नीरज गुंडेंचे संबंध उद्धव ठाकरे यांच्याशीही चांगले असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न विचारण्यात आलं. त्यावर नवाब मलिक म्हणाले, 'उद्धव ठाकरेंशी संबंध नाही. भाजप-शिवसेना सरकारमध्ये कधी कधी नातं बिघडत होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांचा दूध म्हणून मांडवली करण्यासाठी निरोप घेऊन त्यांच्याकडे जायचा', असं मलिक यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक.
नीरज गुंडे माझ्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या जास्त संपर्कात, देवेंद्र फडणवीस यांचं मलिकांना प्रत्युत्तर

'जेव्हा सरकार बनत होतं, तेव्हाही प्रयत्न करत होते. शिवसेना-भाजप सोबत राहावं म्हणून ते उद्धव ठाकरेंना भेटायचे. भाजप-शिवसेना सत्तेत असताना जेव्हा जेव्हा दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण व्हायचा त्यावेळी ते संदेश घेऊन जायचे. चर्चा घडवून आणायचे. त्यामुळे त्यांचा संबंध उद्धव ठाकरेंशी जोडणं योग्य नाही, असं मला वाटतं', असं उत्तर मलिकांनी दिलं.

जयदीप राणा, नीरज गुंडेंवर पोलीस कारवाई करणार का? असा प्रश्न मलिक यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर मलिकांनी भूमिका मांडली. 'जयदीप राणा ड्रग्ज तस्कर आहे. तो जर सुटला, तर पोलीस कारवाई करतील. आम्हाला सत्तेचा दुरूपयोग करून विनाकारण कुणाला अडकवायचं नाहीये.'

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक.
राज्यात ड्रग्जचा खेळ देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरून; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

'शाहरूख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात फसवण्याचं म्हणाल, तर प्रभाकर साईलचा जवाब आहे. ज्यात 18 कोटी वसुलीचं म्हटलं गेलं आहे. 50 लाख घेण्यात आल्याचंही म्हटलेलं आहे. त्याचा पोलीस तपास करत आहे. समिती चौकशी करतेय. प्रभाकर साईलच्या जबाबात तथ्य आढळून आलं, तर पोलीस कारवाई करतील. आमचं सरकार द्वेष भावनेतून काम करत नाही', असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in