'आम्हाला ती जागा 'अशी' मिळाली...' फडणवीसांच्या आरोपानंतर नवाब मलिकांनी सांगितली संपूर्ण कहाणी!

Nawab Malik press conference: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर मलिकांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
'आम्हाला ती जागा 'अशी' मिळाली...' फडणवीसांच्या आरोपानंतर नवाब मलिकांनी सांगितली संपूर्ण कहाणी!
nawab malik press conference answer devendra fadnavis kurla land allegation ncp vs bjp

मुंबई: 'राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री यांनी 1992 सालच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी आणि एका माफियाशी कुर्ल्यातील एका जमिनीचा व्यवहार केला होता. तो व्यवहार काळ्या पैशाशी संबंधित होता.' असा गंभीर आरोप भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (9 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन केला होता. ज्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी देखील तात्काळ प्रत्युत्तर दिलं आहे. 'तुम्हाला माहिती पुरवाणरे हे कच्चे आहेत.' असं म्हणत मलिकांनी फडणवीसांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

पाहा नवाब मलिक नेमकं काय म्हणाले:

'माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की, दिवाळीनंतर फटाके फोडणार. आम्हाला वाटतं फटाके भिजले आणि आवाज झालाच नाही. एक माहोल तयार करण्यात आला की, नवाब मलिक यांचे बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध आहेत.'

'माझ्या 62 वर्षात.. किंवा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर 26 वर्षाच्या कालावधीत अशाप्रकारचे आरोप कधीही कुणीही आमच्यावर लावू शकलं नाही. आज एका जागेबाबत काही कागदपत्र तुम्ही लोकांसमोर ठेवले. की, आम्ही एक जमीन माफियाच्या माध्यमातून कवडीमोल भावाने खरेदी केली. आम्हाला वाटतं तुम्हाला माहिती पुरवणारी लोकं ही फारच कच्चे खेळाडू आहेत.'

'तुम्ही मला सांगितलं असतं तर मीच तुम्हाला सगळे कागद दिले असते. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, यामध्ये बनावट भाडेकरु बनविण्यात आले. आपण सगळे पाहून या की, त्या जागेवर एक मदिनातुल आमान नावाची इमारत आहे. जी 1984 साली इमारत बनली गोवावाला कंम्पाउडच्या नावाने ओळखली जाते. ज्यामध्ये मुनीरा पटेलने रस्सीवाला याला डेव्हलपमेंट राइट्स देऊन 140 ते 150 घरं बनवून इतरांना विकले.'

'त्यामागे जी जमीन आहे तिथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. तिथे आमचं एक गोडाउन आहे जे सॉलिडस कंपनीने लीजवर घेतलं होतं मुनीरा यांच्याकडून. त्याच प्रॉपर्टीमध्ये आमचे चार दुकानं देखील होते.'

'आम्ही कोणत्याही प्रकारे अंडरवर्ल्डच्या दबावाखाली किंवा कोणत्याही बॉम्बस्फोटातील आरोपीकडून ही प्रॉपर्टी आम्ही खरेदी केलेली नाही. इथे आम्ही पूर्वीपासून भाडेकरु होतो. त्या जागेची जी मूळ मालकीण होती तिला वाटत होतं की, आम्ही हा मालकी हक्क घ्यावा. त्यामुळे व्यवहारनुसार आम्ही तो मालकी हक्क घेतला. जे खान कुटुंबीय होते जे तिथले वॉचमन होते ज्यांनी आपलं सात-बारावर नाव चढवलं होतं ते सरेंडर करण्यासाठी आम्ही त्यांना पैसे दिले होते. हे सत्य असताना त्याला राईचा पर्वत बनविण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला.'

'खोटं बोलून कोणाची प्रतिमा मलिन करण्याचा जर तुमचा प्रयत्न असेल तर देवेंद्रजी हा तुमचा गैरसमज आहे. जे काही कागदपत्र आहेत रजिस्टर कार्यलयात उपलब्ध आहेत. कंपनीचं जे काही डिपार्टमेंट आहेत त्यात कागदपत्र आहेत. जो पैशाचा व्यवहार झाला त्याची स्टॅम्पड्युटी आम्ही भरली आहे.'

'आम्हाला वाटतं की, खोटं बोलून नवाब मलिक जो मागील सात वर्षापासून आपल्याशी लढत होता पहिल्यांदा आपल्याकडून असा आरोप लावण्यात आला आहे. जो पूर्णपणे चुकीचा आहे.'

'नवाब मलिकाचे कधीही अंडरवर्ल्डशी संबंध होता किंवा ना नवाब मलिकने बॉम्बस्फोटातील आरोपीकडून संपत्ती खरेदी केली. होय.. वॉचमनने आपलं नाव त्या प्रॉपर्टीवर चढवलं होतं. त्या वॉचमनकडून नाव काढून टाकण्यासाठी त्यांना पैसे देण्यात आले हे सत्य आहे.'

nawab malik press conference answer devendra fadnavis kurla land allegation ncp vs bjp
Nawab Malik: उद्या सकाळी 10 वाजता अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार, नवाब मलिकांचं फडणवीसांना थेट आव्हान

'मी कवडीमोल जमीन कुठेही घेतलेली नाही. याउलट या मुंबई शहरात देवेंद्र फडणवीसांच्या जवळची लोकं प्लॉट हडप करण्याचे धंदे कुठल्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून करत होते आणि कुठला आंतरराष्ट्रीय डॉन जो विदेशातून भारतात आला होता तो कोणासाठी काम करत होता याची माहिती उद्या सकाळी दहा वाजता देण्यात येईल.'

'सरदार शाहवली खानचे वडील हे गोवावाला कंम्पाउंडचे वॉचमन होते. भाडं वसूल करण्याचंही काम करायचे. त्यांच्यामुळे जे मालक होते ते त्रस्त झाले होते. त्या सरदारने सात बाऱ्यावर 300 मीटरवर स्वत:चं नाव चढवून घेतलं होतं.'

'जेव्हा जागेच्या मालकिणीने ही जागा आम्हाला विकली तेव्हा सातबाऱ्यात त्याचं नाव दिसल्याने आम्ही त्याला पैसे दिलेले ही सत्य परिस्थिती आहे. सलीम पटेल हे या गोवावाल्याचे पॉवर ऑफ अटॉर्नी होते. ज्या मालकाने पॉवर ऑफ अटॉर्नी याच्याकडून व्यवहार करुन घ्या. हे आम्हाला सांगितल्यामुळे हे सगळे व्यवहार म्हणजे भाडेकरु असताना. मालकी हक्क घेण्याचं काम केलं आहे.' असं म्हणत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक आरोपाचं उत्तर दिलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in