'ओ माय गॉड' म्हणत मलिकांचं आणखी एक ट्वीट; क्रांती रेडकर म्हणाली 'हे सगळं फेक'

kranti Redkar vs nawab malik : नवाब मलिकांनी क्रांती रेडकरचं चॅट असल्याचा दावा करत एक स्क्रीनशॉट पोस्ट केला... त्यावर हे सगळं खोटं असल्याचं क्रांतीने म्हटलं आहे...
'ओ माय गॉड' म्हणत मलिकांचं आणखी एक ट्वीट; क्रांती रेडकर म्हणाली 'हे सगळं फेक'
क्रांती रेडकर आणि नवाब मलिक...

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आणखी एक स्क्रीनशॉट ट्वीट करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मलिकांनी ट्विटर मेसेजवरील क्रांती रेडकरचं एका यूजर्ससोबतचं चॅट पोस्ट केलं. मात्र, हे चॅट आपलं नसल्याचं सांगत रेडकर यांनी याप्रकरणी सायबर सेलमध्ये तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, ज्या यूजर्ससोबतचं चॅट दाखवण्यात आलेलं आहे. ते आता अस्तित्वातच नाही.

मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना बोलण्यापासून आणि पोस्ट करण्यापासून मनाई करण्यास नकार दिल्यानंतर मलिकांनी आज एक ट्वीट करत खळबळ उडवून दिली. मलिक यांनी क्रांती रेडकर यांचं एका ट्विटरवरील यूजरसोबतचं चॅट पोस्ट केलं आहे. चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये मलिकांबद्दल पुरावे असल्याबद्दलचं सभाषण आहे.

त्या चॅटचा स्क्रीन शॉट पोस्ट करताना मलिकांनी 'ओ माय गॉड' असं म्हटलेलं आहे. त्यात त्यांनी फोटो शेअर केला आहे. तो एका चॅटच्या स्क्रिन शॉटचा आहे. हे चॅट साजिद फॉर एसआरके नावाच्या यूजर आणि समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्यातलं आहे. क्रांती रेडकर यांच्याबरोबर डायरेक्ट मेसेजने केलेल्या संभाषणाचा स्क्रिन शॉट मलिक यांनी ट्विट केला आहे.

डायरेक्ट मेसेजमधील संभाषण काय?

ट्विटर खात्याचं नाव जॅक स्पॅरोने आहे, तर यूजर आयडी साजिद फॉर एसआरके असा आहे. त्या यूजर क्रांती रेडकरला डायरेक्ट मेसेजमध्ये म्हणाला की, 'माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊदचे संबंध असल्याचे ठोस पुरावे आहेत. तर मला डायरेक्ट मेसेज करा.' त्यावर क्रांती रेडकर म्हणते, 'तुमच्याकडे कोणते पुराने आहेत.' त्याला उत्तर देताना या जॅक स्पॅरोने क्रांतीला 'नवाब मलिक आणि दाऊद यांचा फोटो आपल्याकडे आहे', असं उत्तर दिलं. त्यावर क्रांती रेडकर म्हणते 'मला पाठवा, तुम्हाला यासाठी बक्षिस मिळेल.'

क्रांती रेडकर आणि नवाब मलिक...
... असं असलं तरी मलिकांनी वानखेडेंवर केलेले आरोप पूर्ण खोटे नाहीत -बॉम्बे हायकोर्ट

याच चॅटच्या पुढील संभाषणाचा दुसरा स्क्रीनशॉटही मलिकांनी शेअर केला आहे. या चॅटमध्ये या जॅक स्पॅरोने नवाब मलिक आणि अभिनेता राज बब्बर यांचा फोटो क्रांतीला पाठवला. यावर क्रांती म्हणते 'व्हॉट द ****, हे तर राज बब्बर आहे.' यावर उत्तर देताना युजर म्हणतो 'हो. पण राज बब्बरची बायको त्यांना प्रेमाने दाऊद म्हणून हाक मारते.' मलिकांनी दुसरा चॅटचा स्क्रिन शॉट शेअर करताना 'व्हॉट अ जोक' असं म्हटलं आहे.

ज्या यूजरसोबत चॅट केलेले आहे. ते अकाऊंट ट्विटरवर अस्तित्वातच नाही.
ज्या यूजरसोबत चॅट केलेले आहे. ते अकाऊंट ट्विटरवर अस्तित्वातच नाही.

हे चॅट्स फेक... क्रांती रेडकरने केला खुलासा

नवाब मलिक यांचं चॅटचं ट्वीट व्हायरल झाल्यानंतर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरने यावर सविस्तर खुलासा केला आहे. 'हे चॅट्स चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आलेले असून, पूर्णपणे खोटे आहेत. माझी कुणाशीही अशा पद्धतीने चर्चा झालेली नाही. पुन्हा एकदा खात्री न करता पोस्ट करण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करणार आहे. समर्थकांनो काळजी करू नका. ही ना आमची संस्कृती आहे, ना भाषा', असं क्रांती रेडकरने म्हटलं आहे.

22 नोव्हेंबरला मलिकांनी केलेल्या गंभीर आरोपांवर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केलेला आहे. त्याचबरोबर मलिकांना समीर वानखेडे व कुटुंबियांबद्दल बोलण्यास रोखण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती. मागणी फेटाळून लावली आणि प्रथमदर्शनी मलिक यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत, असंही म्हणता येणार नाही, असंही स्पष्ट केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in