नवाब मलिकांच्या राजीनाम्याबाबत भुजबळांचं मोठं वक्तव्य, सरकारची भूमिका केली स्पष्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर आता राज्यातील राजकारण प्रचंड तापलं आहे. काही वेळापूर्वीच नवाब मलिकांच्या कोठडीसाठी कोर्टात सुनावणी पार पडली. तर दुसरीकडे ‘वर्षा’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. याच बैठकीला तीनही पक्षाचे अनेक मंत्री हजर होते. याच बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी महत्त्वाची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार का? याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र याविषयी मीडियाशी बोलताना छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं की, ‘नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही. नवाब मलिकांची अटक ही राजकीय हेतूने प्रेरित आहे. 30 वर्षापूर्वीच प्रकरण मुद्दामून उकरुन ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही.’

‘ईडीने फक्त अटक केली म्हणून नवाब मलिक यांचा राजीनामा घेणं चुकीचं ठरेल आजच्या घडीला. जोवर ते न्यायालयासमोर दोषी ठरत नाही तोवर त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. अटकेचाच निकष लावायचा तर काही दिवसापूर्वी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांचा राजीनामा तेव्हा घेतला होता का?’ असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले:

ADVERTISEMENT

‘मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. की पहाटे नवाब मलिकांच्या घरी ईडीचे लोक गेले. काही तपास वैगरे केला आणि सकाळी त्यांना ऑफिसमध्ये नेलं. त्यानंतर चौकशी करुन कोर्टात उभं केलं. यावेळी दोन्ही बाजूने चर्चा झाली. एकूण काय तर 1992 सालचा एफआयआर. त्यावेळच्या घटना 1999 साली जागेचं काही तरी अॅग्रिमेंट. त्यानंतर 12 वर्षाने PMLचा जन्म.’

ADVERTISEMENT

‘1992 मध्ये स्फोट झाला. पण गेल्या 30 वर्षात कुणीही नाव घेतलं नाही. मलिक हे सातत्याने भाजपविरोधात बोलत आहेत. त्यांचं तोंड बंद करण्यासाठी हा सर्व प्रकार आहे. अन्यायाबाबत बोलत आहेत म्हणून ही कारवाई सुरु आहे.’

‘मलिकांच्या वतीने आरोप फेटाळण्यात आलेले आहेत. पण आता वडाची साल पिंपळाला लावायची हा प्रकार सुरु आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर दबाव आणण्यासाठी हा प्रकार सुरु आहे. लोकशाहीच्या विरोधात हा प्रकार आहे. जो बोलेल त्याच्या विरोधात हा प्रकार आहे.’

…म्हणून पाठीमागून अफझलखानी वार… चालू द्या; संजय राऊत भडकले

‘नुकतीच आता शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्याशी आमची चर्चा. तीनही पक्ष मिळून कायदेशीर लढा लढणार आहोत.’

‘उद्या 10 वाजता या सगळ्याच्या निषेधार्थ मंत्रालयाच्या शेजारी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याशेजारी धरणं धरुन बसणार आहोत. परवापासून पूर्ण राज्यात तीनही पक्षाचे लोकं एकत्र येऊन शांततेने मोर्चा, आंदोलन केलं जाईल.’

‘नवाब मलिकांवर अद्याप गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही. जोपर्यंत ते दोषी आहेत हे सिद्ध होत नाही. तोवर राजीनामा घेणार नाही. विशिष्ठ हेतूने ही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आताच राजीनामा घ्यायला पाहिजे हे पटत नाही. खरं तर नारायण राणेंना अटक झाली होती. त्यांचा राजीनामा तुम्ही घेतलात का?’

‘भाजपकडून आता मुद्दाम एकेका मंत्र्याला अडकवण्याचं काम सुरु आहे. पण आता मलिकांच्या राजीनाम्याचा आसुरी आनंद भाजपला घेऊ देणार नाही.’ असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT