Cruise drug case मधले NCB चे दोन पंच साक्षीदार; एक भाजप कार्यकर्ता, दुसरा फसवणूक प्रकरणात आरोपी

जाणून घ्या या दोघांबाबत... कोण आहेत हे दोघे...
Cruise drug case मधले NCB चे दोन पंच साक्षीदार; एक भाजप कार्यकर्ता, दुसरा फसवणूक प्रकरणात आरोपी
NCB's Panch witnesses in Cruise drug bust ,One a BJP worker,another a Cheating case accused

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB वर असा आरोप केला की शनिवारी क्रूझ टर्मिनल आणि ड्रग्ज पार्टी छाप्यादरम्यान दोन खासगी व्यक्ती तिथे कशा काय आल्या? त्यांचा हा रोख मनिष भानुशाली आणि के. पी. गोसावी यांच्याकडेच होता. मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसंच भाजपच्या सांगण्यावरून कारवाई झाल्याचाही आरोप त्यांनी केला. एवढंच नाही तर सगळी कारवाईच बनाव असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र एनसीबीने असं म्हटलं आहे की हे दोघे त्यांचे पंच साक्षीदार आहेत.

या दोघांचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट या दोघांसह इतर जणांवर अटकेची कारवाई केल्यानंतर हे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या दोन व्यक्ती कोण हा प्रश्न उपस्थित होतो आहे. नवाब मलिक यांनी या दोघांचे व्हायरल झालेले फोटो आणि व्हीडिओ दाखवत हे दोघे कोण आणि ते एनसीबीच्या छाप्यावेळी तिथे काय करत होते असे प्रश्न विचारले आहेत. आर्यन खान सोबत के.पी. गोसावीने फोटो काढला होता. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. तसंच के. पी. गोसावी हे जेव्हा पोलीस ठाण्यात जात आहेत तेव्हा त्यांना एक पोलीस अडवतो आहे असाही एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे तो देखील नवाब मलिक यांनी ट्विट केला आहे.

NCB's Panch witnesses in Cruise drug bust ,One a BJP worker,another a Cheating case accused
आर्यन खानला ताब्यात घेणारे के.पी. गोसावी कोण?

कोण आहे मनिष भानुशाली?

इंडिया टुडेने मनिष भानुशाली यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी मनिष भानुशाली यांनी असं सांगितलं की एका क्रूझवर ड्रग पार्टी होणार आहे अशी माहिती मला मिळाली होती. त्यामुळे मी तसं NCB ला कळवलं. त्यानंतर NCB ने त्या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी तिथे आर्यन खानसहीत इतरही काही लोक होते ज्यांना अटक करण्यात आली. एवढंच नाही तर त्या ठिकाणी पोलिसांना ड्रग्जही आढळून आले. मनिष भानुशाली यांनी असं सांगितलं की ते डोंबिवली या ठिकाणी राहतात आणि ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने ते बऱ्याचदा दिल्लीमध्ये असतात. तसंच या प्रकरणी मी साक्षीदार असल्याने मी त्या ठिकाणी होतो असंही त्यांनी सांगितलं. मनिष भानुशाली यांचे दिल्लीतल्या बड्या भाजप नेत्यांसोबत फोटो आहेत. नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा यांच्यासह महाराष्ट्र भाजपमधील देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासोबतही त्यांचे फोटो आहेत. जे त्यांच्या फेसबुक पेजवर दिसतात.

2010 मध्ये मनिष भानुशाली यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूकही लढवली होती. त्यावेळी गावदेवी सोसायटी वॉर्डातून भाजपने त्यांना तिकिट दिलं होतं. मात्र काँग्रेसच्या उमेदवारांने मनिष भानुशाली यांचा पराभव केला.

मनिष भानुशाली यांना नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारलं असता ते म्हणाले की, मी तिथे साक्षीदार म्हणून गेलो होतो. बाकी मी कुणालाही त्या ठिकाणी ऑफिसमध्ये घेऊन गेलो नाही. खरंतर अशा प्रकारच्या खबरी देणं हे जिवाच्या जोखमीचं काम असतं पण तो धोका पत्करून मी देशहिताचं कार्य केलं आहे.

आर्यन खान
आर्यन खान फोटो-इंस्टाग्राम

कोण आहेत किरण गोसावी?

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आरोपांनुसार किरण गोसावी हे खासगी गुप्तहेर आहेत. किरण गोसावी हे तेच आहेत ज्यांचा आर्यन खानसोबतचा सेल्फी चांगलाच व्हायरल झाला. हा फोटो NCB ने जेव्हा क्रूझवर रेड केली तेव्हाचा आहे त्यामुळे साहजिकच के. पी. गोसावी कोण हा प्रश्न निर्माण झाला. केपीजी ड्रीम्स सोल्युशन्स नावाची एक कंपनी त्यांनी स्थापन केली होती. या प्रकरणात 2018 मध्ये त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा पुण्यात दाखल झाला होता. मलेशियात जॉब लावून देतो असं सांगून के. पी. गोसावी यांनी तक्रारदाराची 3 लाख रूपयांना फसवणूक केली होती. हे प्रकरण 2018 मध्ये घडलं होतं. या प्रकरणी तक्रारदाराला मलेशियाला धाडण्यात आलं होतं मात्र तिथे गेल्यावर त्याला लक्षात आलं की आपली फसवणूक झाली होती. ज्यानंतर त्याने तक्रार दाखल केली होती. के. पी. गोसावी हे देखील ड्रग्ज केसमध्ये NCB चे पंच साक्षीदार आहेत.

Related Stories

No stories found.