Budget 2022 : अर्थसंकल्पावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Budget 2022 : अर्थसंकल्पावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सर्वसामान्यांची आणि शेतकऱ्यांची निराशा करणारा अर्थसंकल्प हा ठरला आहे असं शरद पवारांनी म्हटलं आहे

मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. याबाबत दिवसभर प्रतिक्रिया उमटत होत्या. आता माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा मोदींच्या हाती सत्ता आल्यापासूनचा सातवा अर्थसंकल्प आहे. सामान्य माणसाची अपेक्षा अशी होती की हे सरकार हळूहळू सामान्यांवरची कर आखणी खाली आणेल. नोकरी क्षेत्रातल्या लोकांच्या अपेक्षा जास्त असतात. मात्र बजेट पाहिल्यानंतर लोक निराश झाले आहेत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हा देश प्रामुख्याने शेतीच्या क्षेत्रात काम करणारा देश आहे. गेल्या काही वर्षांपासून देशातल्या शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी खूप कष्ट केलं. आज शेती उत्पादनाच्या बाबतीत आपण एका चांगल्या स्थितीला जाऊन पोहचलो. त्यामुळे शेतकरी वर्गाची ही अपेक्षा होती की या क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी भूमिका घेतली गेली पाहिजे होती. पाटबंधारे, एरिगेशन यासाठी काही तरतुदी केल्या, मात्र जी गरज होती अपेक्षा होती त्याची पूर्तता झालेली नाही. शेतकऱ्यांबाबत काम करणारे घटक आहे त्यांच्या प्रतिक्रिया निराशाजनक अशा आहेत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Budget 2022 : अर्थसंकल्पावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Budget 2022: काय स्वस्त, काय महाग? पाहा बजेटमधून 'कॉमन मॅन'ला काय मिळणार

आणखी काय म्हणाले आहेत शरद पवार?

बजेट हे गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारं असलं पाहिजे, अधिक हाताला काम देणारं असलं पाहिजे, सर्वसामान्य माणसाला ज्या दैनंदिन जीवनात वस्तू लागतात त्याच्या किमती नियंत्रण ठेवून महागाईला आटोक्यात आणण्यासाठी बजेट मध्ये तरतूद असायला पाहिजे परंतु याची पूर्तता बजेटमध्ये झालेली दिसत नाही. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

60 लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा वायदा केला आहे पण गेल्या 2 ते 3 वर्षात प्रती वर्षी इतक्या नोकऱ्या देऊ सांगितले जाते पण त्याची पूर्तता होत नाही त्यामुळे पाठीमागचा अनुभव बघितला तर विश्वास ठेवण्यासासारखी परिस्थिती नाही असं म्हणत शरद पवारांनी मोदी सरकारच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केला आहे.

प्रत्येक राज्याची स्थिती वेगळी आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत शेतकरी वर्ग संघटित झालेला दिसतो. तीन-चार महिन्यांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर उत्तर प्रदेशचे शेतकरी वर्षभर मागण्यांसाठी बसले होते. कायदे परत घेण्यात आले. मात्र त्यांना इतरही अपेक्षा होत्या त्याची पूर्तता झाली नाही. त्याचा परिणाम उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर होईल. भाजपला त्याची किंमत मोजावी लागेल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in