'मी चारदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, पण...' शरद पवारांचा फडणवीस यांना खोचक टोला

जाणून घ्या नेमकं शरद पवारांनी काय सुनावलं आहे देवेंद्र फडणवीस यांना
'मी चारदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, पण...' शरद पवारांचा फडणवीस यांना खोचक टोला

मी आजही मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं, माझ्या सहकाऱ्यांनी मला मी मुख्यमंत्री नाही हे भासू दिलं नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. याबाबत आज शरद पवार यांनी खास आपल्या शैलीत टोलेबाजी केली आणि देवेंद्र फडणवीस यांना खडे बोल सुनावले. सत्ता गेल्याची वेदना किती खोलवर रूतली आहे हे यातून दिसतं असंही शरद पवार यांनी सुनावलं. आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्लीही उडवली.

काय म्हणाले शरद पवार?

'देवेंद्र फडणवीस यांचं भाषण मी ऐकलं. ते म्हणाले मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही. पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट होतं. मी चारवेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, पण माझ्या कधी लक्षात राहिलं नाही. पाच वर्षे सत्तेत राहूनही आपण सत्तेत आहोत असं फडणवीसांना वाटतं ही चांगली आणि जमेची गोष्ट आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. ही कमतरता आमच्यामध्ये आहे. मी चारवेळा मुख्यमंत्री झालो पण माझ्या लक्षातही नाही. ' असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली होती.

एवढंच नाही तर शरद पवार पुढे म्हणाले की, 'मी असं कधी म्हटलं नव्हतं मी पुन्हा येईन, मी येणार. मी पुन्हा येईन अशी भाषा मी केली नव्हती. पण देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हापासून आत्तापर्यंत सत्ता गेल्याची वेदना किती खोलवर आहे हेच दाखवून दिलं आहे. सत्ता येते, जाते त्याचा फारसा विचार करायचा नसतो. सत्ता असताना समंजसपणाने सत्तेचा वापर हा लोकांच्या आणि राज्याच्या भल्यासाठी करायचा असतो.' असंही शरद पवार म्हणाले.

'मी चारदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, पण...' शरद पवारांचा फडणवीस यांना खोचक टोला
मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतं....- देवेंद्र फडणवीस
शरद पवार
शरद पवारPhoto- Twitter

मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो माझं मुख्यमंत्रीपद गेलं तेव्हा मी विरोधी पक्षनेताही होतो. त्यावेळी माझा व्यक्तिगत अनुभव हा आहे की, विरोधी पक्षात काम करणं हे अधिक सुखावह असतं. मंत्री असताना आपण काही निर्णय घेतो तेव्हा अधिकारी सांगतात चांगली गोष्ट आहे. इतर सहकारी सांगतात, कार्यकर्ते सांगतात. हे सगळे सांगतात अतिशय उत्तम परिस्थिती आहे. पण जेव्हा तुम्ही पदावर नसता त्यावेळी लोकांमध्ये राहून निर्णय घेतल्यानंतर लोकांमध्ये काय परिस्थिती आहे त्याचं वास्तव कळतं. मी स्वतः माझ्यापुरतं सांगतो की मला विरोधी पक्षनेता म्हणून मला शिकायला मिळालं आहे. इथे वेगळी स्थिती दिसते त्यावर मी भाष्य करणार नाही असंही शरद पवार म्हणाले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

पाटीलसाहेब आणि गणेश नाईक आहेत. तुमच्यासारखे नेते पाठिशी असल्याने मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही तो काय करतो हे महत्त्वाचं आहे. गेले दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिलेलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. विरोधी पक्षनेता म्हणून काम करतो आहे. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी आशीर्वाद घ्यायला इथेच येणार आहे'

Related Stories

No stories found.