NCP च्या नेत्याकडून सुप्रिया सुळेंचा विश्वासघात?, ‘तो’ किस्सा चर्चेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Supriya Sule interview : नागालँडंमध्ये राष्ट्रवादीने (NCP) सत्ताधारी एनडीपीपी (NDPP) आणि भाजप (BJP) आघाडीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीने अचानक घेतलेल्या या भूमिकेने नागालँडसह (Nagaland) महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दर्शवलाय, तिथल्या सरकारला नाही,अशी भूमिका मांडली. हीच भूमिका सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी देखील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मांडली होती. या भूमिकेनंतर आता एका किस्स्यामुळे सुप्रिया सुळे चर्चेत आला आहे. हा किस्सा एका राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या संदर्भातला आहे. हा नेता सुप्रिया सुळे यांचा विश्वासघात करून भाजपात गेला होता. हा नेता कोण आहे? अशी चर्चा आता राजकिय वर्तुळात रंगली आहे. (ncp leader betrayed and went to bjp supriya Sule told that story)

सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला एका युट्यूबरला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या होत्या. या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या त्या नेत्याचा किस्सा सांगितलाय. तुमचा कोणी विश्वासघात केला आहे का? असा प्रश्न त्यांना मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर त्यांनी असे अनेक जण आहेत. पण मला त्यांचे नाव सांगायचे नाही आहे,असे म्हणत त्यांनी पक्षाशी संबंधित एक किस्सा सांगितला. या किस्स्यामध्ये त्यांनी त्या बड्या नेत्याचे नाव घेणे टाळले आहे.

ED च्या अटकेपूर्वीच सोमय्यांनी बातमी फोडली, सदानंद कदम ईडीच्या ताब्यात

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुप्रिया सुळे (Supriya sule) यांचा एका राष्ट्रवादीच्याच बड्या नेत्याने विश्वासघात केला होता. गेल्या अनेक वर्षापासून तो नेता पक्षासाठी काम करत होता. तो पक्ष सोडून जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळस मी त्याला फोन करून जाब विचारला असता, त्याने एका समस्येचे कारण देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते. पुढे सुप्रिया सुळे यांनी त्यांना घरी चर्चेसाठी बोलावत,जर मला खरंच वाटलं तुम्हाला जाण्याची गरज आहे, तर तुम्ही खरंच जा, असा सल्लाही दिला.

Sanjay Raut: ‘मनसेच्या वाटेला जाण्याइतकं त्यांचा पक्ष..’, खोचक प्रत्युत्तर

ADVERTISEMENT

काही दिवसांनी सुप्रिया सुळे (Supriya sule) यांची निवासस्थानी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यासोबत तीन तास बैठक पार पडली. या बैठकीत सुळे यांनी त्यांना पक्ष सोडून न जाण्याचा सल्ला दिला. तसेच तुम्हाला खरंच वाटतंय गेलं पाहिजे तर खरंच जा, आणि ते गेले. 2019 दरम्यानची ही घटना आहे. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्याचा खुलासा सुळे यांनी केला. दरम्यान बड्या नेत्याने पक्ष सोडल्यानंतर त्या कारणांचा सुप्रिया सुळे यांनी शोध घेतला असता,त्यांना मोठा धक्का बसला. ज्या केसच्या भीतीने बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याची भूमिका घेत होता. त्या केसमध्ये काहीच दम नव्हता. ती केस काहीच नव्हती. त्यावेळेस माझा विश्वासघात झाला असे सुप्रिया सुळे कबूल मुलाखतीत करतात.

ADVERTISEMENT

Nagaland : भाजप-राष्ट्रवादी एकत्र; विरोधक नसलेलं नवं सरकार कसं आहे?

दरम्यान या मुलाखतीची खुप चर्चा आहे. तसेच हा नेता नेमका कोण आहे, ज्याने राष्ट्रवादीसोडून भाजपात प्रवेश केला आहे. असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सुप्रिया सुळे (Supriya sule) यांच्या किस्स्याची राजकिय वर्तुळाच चर्चा आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT