40 वर्षे तुमच्यासोबत असताना मी चांगला होतो, राष्ट्रवादीत येताच माझ्यामागे ईडी लावली-एकनाथ खडसे

रावेरमधल्या सभेत एकनाथ खडसे यांचं वक्तव्य
40 वर्षे तुमच्यासोबत असताना मी चांगला होतो, राष्ट्रवादीत येताच माझ्यामागे ईडी लावली-एकनाथ खडसे

रावेर येथील मेळाव्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीकेचे बाण चालवले आहेत. तपास यंत्रणांना हाताशी धरून माझ्याविरोधात राजकारण केलं जातं आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. मी 40 वर्षे तुमच्यासोबत (भाजप) होतो तेव्हा चांगला होतो. राष्ट्रवादीत येताच माझ्यामागे ईडी लावली अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे.

40 वर्षे तुमच्यासोबत असताना मी चांगला होतो, राष्ट्रवादीत येताच माझ्यामागे ईडी लावली-एकनाथ खडसे
एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही EDचं समन्स, खडसे कुटुंबाच्या अडचणी वाढल्या

नेमकं काय म्हणाले आहेत एकनाथ खडसे?

'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून माझ्यामागे तुम्ही (भाजप) ईडी लावली आहे. चौकशीचा आणि तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे. मी चाळीस वर्षे तुमच्यासोबत होतो, तेव्हा चांगला होतो. आता राष्ट्रवादीत येताच माझ्यामागे ईडी चौकशी लावली गेली आहे. तुम्ही जे काही करत आहात त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भोगावं लागेल. जनता तुम्हाला माफ करणार नाही. ' असं म्हणत एकनाथ खडसे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजप या पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून मी गाव पातळीवर परिश्रम केले आहेत. मात्र ज्या माणसाच्या बळावर, कष्टांवर तुम्ही इतके दिवस उभे राहिलात त्याच माणसाचा तुम्ही अपमान केला आहे. सध्याचं राजकारण तुम्ही बघत आहातच. कुणाच्या मागे ईडीच्या चौकशा लावल्या जात आहेत ते स्पष्टपणे दिसतं आहे असंही एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे नेते राष्ट्रवादी

आणखी काय म्हणाले एकनाथ खडसे?

'मी अनेक लोकांना घडवलं आहे. पक्षाच्या माध्यमातून मोठं केलं. अनेक जण नाथाभाऊंच्या आशीर्वादाने मोठे झाल्याचं सांगतात. कोणी पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य झाले. मेहनत आणि कष्ट उपसून मी माणसं उभी केली आहे. 30 वर्षांपूर्वी मी एकटा आमदार होतो. पुढे पक्ष वाढत गेला. गावागावांमध्ये पक्ष पोहचला. सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाण्यासाठी आम्ही मेहनत केली.' असंही खडसेंनी म्हटलं आहे.

40 वर्षे तुमच्यासोबत असताना मी चांगला होतो, राष्ट्रवादीत येताच माझ्यामागे ईडी लावली-एकनाथ खडसे
एकनाथ खडसेंच्या ED चौकशीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

एकनाथ खडसे-गिरीश महाजन वादही शिगेला

जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन यांच्यातला वाद काहीकेल्या शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत. गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर, मोक्काच्या भीतीमुळे कोरोनाची लागण झाली असावी असा संशय एकनाथ खडसेंनी व्यक्त केला. ज्याला उत्तर देताना गिरीश महाजनांनी खडसेंना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखवण्याची गरज असल्याचं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.

रविवारी पुणे पोलिसांनी जळगावमध्ये केलेल्या धाडसत्रानंतर एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा गिरीश महाजनांवर बोचरी टीका करत प्रत्युत्तर दिलं आहे. नाथाभाऊंना ठाण्याला पाठवण्याची गरज नाही पण गिरीशभाऊंना पुण्यातली बुधवार पेठ दाखवली पाहिजे असं म्हणत खडसेंनी महाजनांवर पलटवार केला आहे. पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी रविवारी गिरीश महाजन यांच्या निटकरवर्तीयांच्या घरावर छापेमारी केली. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादासंदर्भात महाजनांविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीवर ही कारवाई झाल्याचं बोललं जात आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in