Eknath Khadse: 'या' त्रासाला कंटाळलेल्या खडसेंनी घेतली थेट मधमाशी चाव्याची थेरेपी!

Eknath Khadse: एकनाथ खडसे यांनी पाठदुखी आणि गुडघेदुखीवर उपचार म्हणून चक्क मधमाशा चाव्याचे उपचार घेतले आहेत.
ncp leader eknath khadse who is fed up with back and knee pain is currently taking bee bite therapy
ncp leader eknath khadse who is fed up with back and knee pain is currently taking bee bite therapy(फाइल फोटो)

जळगाव: भाजपचे माजी मंत्री आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे गेल्या अनेक वर्षापासून पाठदुखी आणि गुडघेदुखीने त्रस्त आहेत. यासाठी त्यांनी अनके उपचारही केले पण त्याने फारसा फरक त्यांना पडलेला नाही. त्यामुळेच आज (23 मार्च) त्यांनी एका वेगळ्याच पद्धतीचे निसर्गोपचार घेतले आहेत. ही निसर्गोपचार पद्धती म्हणजे चक्क मधमाशी चावा.

या थेरेपीत निसर्गोपचार पद्धतीनं उपचार होत असल्यानं खडसेंची वेदनेतून मुक्ती झाली आहे. खडसे गेल्या अनेक वर्षांपासून पाठदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास सहन करत होते. या त्रासामुळे अनेकदा त्यांना आधाराशिवाय चालता येत नव्हतं. एकवेळ अशी आली होती की त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागायचा. पण आता या थेरेपीमुळं त्यांचा त्रास लक्षणीयरित्या कमी झाला आहे.

औरंगाबादचे डॉ. नांदेडकर हे खडसेंवर उपचार करत आहेत. या उपचारपद्धतीनं अनेकांना रक्तदाब, शुगर, थायरॉईडच्या त्रासातून बरं केल्याचा डॉ. नांदेडकर यांनी दावा केला आहे. अपेक फ्लोरा नावाच्या मधमाशीचा या उपचार पद्धतीमध्ये वापर केला जातो. या मधमाशीचा दंश रुग्णाच्या कंबरेच्या खाली एका विशिष्ट भागी दिला जातो.

दंश झाल्यानंतर मधमाशीचं विष हे रुग्णाच्या अंगात भिनतं. ही प्रक्रिया साधारणपणे 30 सेकंदात पूर्ण होते. हे विष संतुलित स्वरुपाचं असतं ज्याचा रुग्णाला फायदा होतो.

मधमाशी दंशाच्या उपचार पद्धतीची दुसरी थेरेपी एकनाथ खडसे यांच्यावर सुरू आहे. खडसे यांनी त्यांना होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी जोधपूर, केरळच्या वाऱ्या केल्या होत्या. मुंबईमध्येही त्यांनी उपचार करुन पाहिले होते. मात्र, त्यांचा त्रास कमी झाला नव्हता. आता मधमाशी चाव्याची थेरेपी केल्याने आपल्याला 70 ते 80 टक्के फायदा झाला आहे. आपण आता कोणाच्याही आधाराशिवाय चालू शकतो, लहान पायऱ्याही चढू शकतो, असं खडसे सांगतात.

पाहा या उपचार पद्धतीबाबत खडसे नेमकं काय म्हणाले:

'गेल्या अनेक दिवसांपासून मला गुडघेदुखी आणि पाठदुखीचा त्रास होता त्यामुळे आधाराशिवाय चालणं जरा अवघड होतं. बऱ्याचदा याचा परिणाम मला जाणवायचा. यावर अनेक ठिकाणी उपचार केले. महाराष्ट्रभर नाही तर देशभरात ज्या-ज्या ठिकाणी मला सुचविण्यात आलं त्या-त्या ठिकाणी जाऊन आलो. बराचसा पैसाही खर्च केला. मधल्या काळात व्हीलचेअरवर देखील काही दिवस घालवले. पण फार काही सुधारणा झाली नाही.'

'यादरम्यान, औरंगाबादचे डॉ. कुलकर्णी म्हणून आहेत त्यांनी मधमाशी चिकित्सा निसर्गोपचार हा मला सांगितला. यावेळी त्यांनी माझ्यावर स्वत: उपचार केले. एका विशिष्ट जागेवर, विशिष्ट पद्धतीने मधमाशी चावा घेते. त्या मधमाशीमध्ये नैसर्गिक स्टिरॉईड आहे. त्याचे साईड इफेक्ट काही नाही. त्यामुळे दुखणं ताबडतोब बंद होतं. यामुळेच माझी गुडघेदुखी आणि पाठदुखी बंद होऊन गेली. याचा मला 70-80 टक्के चांगला परिणाम झाला.'

ncp leader eknath khadse who is fed up with back and knee pain is currently taking bee bite therapy
'मी टरबुजा म्हणणार नाही पण......' एकनाथ खडसे यांची पुन्हा एकदा फडणवीसांवर टीका

'महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधमाशी चाव्याचे काही पैसे घेतले जात नाही. फक्त जी काही इतर आयुर्वेदीक औषधं दिली जातात त्याचे ते अगदी नाममात्र 150-200 रुपये घेतात. त्यामुळे फार पैसेही लागत नाही. पण सेवा देण्यासाठी ते तत्पर असतात.' अशी माहिती एकनाथ खडसे यांनी यावेळी दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in