'केंद्राचं उत्पन्न वाढवण्यासाठी...'; जयंत पाटलांनी ईडी, आयटीला दिला सल्ला
जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.twitter

'केंद्राचं उत्पन्न वाढवण्यासाठी...'; जयंत पाटलांनी ईडी, आयटीला दिला सल्ला

केंद्रीय तपास यंत्रणाच्या धाडसत्रावर जयंत पाटलांनी लगावला टोला : 'खासगी व्यवसाय करणाऱ्यांना मोकाट स्वैराचाराची परवानगी'

मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवाया वाढल्या असून, सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी आणि लोकांच्या चौकशा केल्या जाताना दिसत आहे. विशेषतः महाविकास आघाडी सरकारमधील आणि सरकारमध्ये असलेल्या पक्षातील नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा लागल्याचं दिसत आहे. या कारवायांबद्दल माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ईडी, आयकरला सल्ला देत टोला लगावला आहे.

माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले,'महाराष्ट्र सरकारला नामोहरम करण्याचं तसेच सरकार पडत नाही म्हटल्यावर वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; हे जगजाहीर आहे. अलीकडे धाडसत्र सुरू झाले आहे. प्रत्येकावर धाड टाकली जाते. त्यासाठी वेगवेगळी माहिती काढली जाते', अशी भूमिका पाटील यांनी मांडली.

'ईडी वा आयकर विभाग असो, त्यांनी केंद्र सरकारचे उत्पन्न वाढवण्यासाठी देशात दोन नंबरचा व्यवहार करणारे, काळा बाजार करणारे, ज्यांच्याकडे अवैध संपत्ती आहे अशा लोकांच्या मागे लागलं पाहिजे. मात्र अलीकडच्या काळात या यंत्रणा राजकारण्यांच्या मागे लागल्या आहेत', असा आरोप जयंत पाटील यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर केला.

जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.
आता हसन मुश्रीफांचे जावई किरीट सोमय्यांच्या रडारवर, केला हा गंभीर आरोप

'खासगी व्यवसाय करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांना मोकाट स्वैराचार करण्याची परवानगी आहे. विरोधी पक्षातील राजकीय लोकांचा मात्र १०-१० वर्षांपूर्वीचा इतिहास काढून त्याच्यावर बोट ठेवण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. या सगळ्याची जाणीव जनतेला झाली आहे', असं मतही जयंत पाटील यांनी यावेळी मांडलं.

जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.
जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या टीकेला अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...

शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मंत्र्यांवर आरोप आणि धाडी

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी मंत्री आणि नेते ईडी, आयकरच्या रडारवर असल्याचं दिसत आहे. शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी, आनंदराव आडसूळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याच्या नातेवाईकांच्या घरी ईडी, आयकरने झाडाझडती घेतली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in