'चंद्रकांत पाटील मला कधी खिशात टाकतात त्याची वाट पाहतोय, मग...' -नवाब मलिक

'चंद्रकांत पाटील मला कधी खिशात टाकतात त्याची वाट पाहतोय, मग...' -नवाब मलिक

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यासारखे नेते आपल्या खिशात असल्याचं वक्तव्य केलं. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. 'चंद्रकांत पाटील मला कधी खिशात टाकताय याची वाट पाहतोय, मग मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे' अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिलं आहे. त्यांनी चंद्रकांत पाटलांचा व्हीडिओ ट्विट करत त्यांना प्रत्युत्तर दिलंय.

नवाब मलिक म्हणाले, 'भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगत आहेत मी नवाब मलिक यांना खिशात ठेवतो. त्यांचा खिसा इतका मोठा आहे हे मला माहीत नाही. मी वाट बघतोय ते कधी त्यांच्या खिशात टाकत आहेत. मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे त्यासाठी चंद्रकांतजी मला तुमच्या खिशात टाका.'

भाजपचे मोठमोठे नेते, त्यांच्याजवळचे लोकं एनसीबीच्या कार्यालयात जातात. ते एनसीबी अधिकाऱ्यांना भेटत आहेत. काही भाजपचे नेते यांचे राईट हँड समीर वानखेडेला भेटत आहेत, हे मी जबाबदारीने सांगतोय. या हालचाली वाढल्या आहेत. पोपट पिंजऱ्यात गेला तर आणखी अनेक गुपितं बाहेर येतील म्हणून जीन असलेले भाजपाचे लोक घाबरायला लागला आहेत. हिवाळी अधिवेशनात मोठमोठे नावं समोर येणार आहेत.'

आज नवाब मलिक काय म्हणाले?

समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच आहेत. बोगस दाखला दाखवून समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवले. मी माझ्या दाव्यावर ठाम आहे की ते जन्माने मुस्लिम आहेत असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 2015 पासून या लोकांनी त्यांची ओळख लपवण्यास सुरूवात केली. फेसबुक पेजवर दाऊद वानखेडे असंच नाव होतं. नंतर ज्ञानदेव लिहिण्यास सुरूवात केली आहे. एवढंच नाही तर समीर वानखेडे यांचे नातेवाईकच मुस्लिम आहेत असाही दावा नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

ज्ञानेश्वर वानखेडेंनी दिलं उत्तर

मी जन्मल्यापासून शाळेच्या दाखल्यापर्यंत एनसीसी आणि सर्व्हिसला लागल्यापासूनचे सर्व कागदपत्रं आमच्याकडे आहेत. मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी महार जातीतील आहे. मी मुस्लिम महिलेशी 1978 मध्ये लग्न केलं आहे. मी हिंदू पद्धतीने लग्न केलं आहे. समीर आणि मी कधीही धर्मांतर केलं नाही, असा दावा करतानाच आमच्यावरील खासगी आरोप थांबवा. प्रश्न फक्त ड्रग्जचा आहे. तुमच्या जावयाला अटक केल्यामुळे आम्हाला बदनाम करू नये. तुम्ही कोर्टात जावं आमची बदनामी करू नका, असं त्यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in