आव्हाडांनी राज ठाकरेंना डिवचलं, म्हणाले किणी खून प्रकरणात बाळासाहेबांना कुठे जावं लागलं?

मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली सुंदोपसुंदी कायम
आव्हाडांनी राज ठाकरेंना डिवचलं, म्हणाले किणी खून प्रकरणात बाळासाहेबांना कुठे जावं लागलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या आपल्या गुढीपाडव्याच्या सभेतील भाषणामुळे चांगलेच चर्चेत आहेत. राज ठाकरेंनी शरद पवारांवर जातीयवादाचा संदर्भ देऊन केलेली टीका राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच जिव्हारी लागली. राज यांच्या या टीकेला राष्ट्रवादीने जशास तसं उत्तरही दिलं. परंतू या दोन पक्षांमधलं द्वंद्व इथेच थांबलं नाही.

केंद्रीय तपासयंत्रणांच्या कारवाईवरुन शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची नुकतीच भेट दिली. या भेटीवर टीका करणाऱ्या मनसेला राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर देताना थेट राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आव्हाडांनी राज ठाकरेंना डिवचलं, म्हणाले किणी खून प्रकरणात बाळासाहेबांना कुठे जावं लागलं?
राज ठाकरेंच्या 'उत्तर'सभेचा मार्ग मोकळा, ठाणे पोलिसांनी दिली परवानगी

राष्ट्रवादी काँग्रेसने नेते अनिल देशमुख, नवाब मलिक हे सध्या केंद्रीय तपासयंत्रणाच्या कारवाईमुळे अटकेत आहेत. पवार-मोदी भेटीला या कारवाईचा संदर्भ देऊन मनसेने राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. ज्याला उत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनी किणी खून प्रकरणात स्वर्गीय बाळासाहेबांना कुठे-कुठे जावं लागलं होतं हे आमच्या स्मृतीत आहे, असं ट्विट केलं आहे.

मुंबईत गाजलेल्या रमेश किणी खून प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणात राज ठाकरे यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन पंतप्रधानांची भेट घेतल्याची चर्चा आजही जुने राजकीय जाणकार ऐकवतात. या प्रकरणात सबळ पुराव्याअभावी राज यांची निर्दोष मुक्तता झाली होती. याच प्रकरणाचा दाखला देत आव्हाडांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आव्हाडांनी राज ठाकरेंना डिवचलं, म्हणाले किणी खून प्रकरणात बाळासाहेबांना कुठे जावं लागलं?
राज ठाकरेंना का घ्यावी लागतेय 'उत्तर' सभा.., भोंग्यावरुन मनसेमध्ये नेमकं चाललंय काय?

Related Stories

No stories found.