'परमबीर सिंग, वाझे जनतेचे सेवकच होते पण करत होते दुसरे धंदे', वानखेडेंवर मलिकांचा निशाणा

Nawab Malik attack on Sameer Wankhede: परमबीर सिंग, सचिन वाझे हे पण जनतेचे सेवक होते पण त्यांचे दुसरेच धंदे सुरु होते. हा व्यक्ती देखील त्यातीलच आहे. असं म्हणत मलिकांनी समीर वानखेडेंवर टीका केली आहे.
'परमबीर सिंग, वाझे जनतेचे सेवकच होते पण करत होते दुसरे धंदे', वानखेडेंवर मलिकांचा निशाणा
ncp nawab malik attack on sameer wankhede mumbai cruise drug case parambir singh sachin waze

मुंबई: 'परमबीर सिंग, वाझे देखील जनतेचे सेवकच होते. शर्मापण जनतेचे सेवक होते. परंतु ते देशसेवा न करता हे दुसरे धंदे करत होते. हा व्यक्ती देखील त्यातील आहे. हळूहळू याचा सगळा खुलासा करणार आहे.' असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी NCB अधिकारी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

पाहा समीर वानखेडेंबाबत नवाब मलिक नेमकं काय म्हणाले:

'कलाकारांकडून यांनी पैसे घेतले आहेत. दोन ग्रॅम, चार ग्रॅम ड्रग्सप्रकरणी पैसे घेतले. त्यांच्यापेक्षा आमच्या राज्य सरकारच्या नार्कोटिक्स विभागाने काल दिवसभरात मोठ्या कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये 20 किलो ड्रग्ज पकडले आहेत. त्यांची कामे आमचा विभाग करतो आहे. जसजसे पुरावे हातात येतील तसतशी यांची पोलखोल करणार.' असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

क्रूझवर भाजप नेत्याचा मेव्हणा पण सापडलेला पण त्याला सोडून दिलं

क्रूझ ड्रग्स प्रकरणी नवाब मलिक यांनी अनेक आज (8 ऑक्टोबर) देखील पत्रकारांशी संवाद साधताना एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

'क्रूझवर ज्या 10 लोकांना पकडलं होतं त्यापैकी 2 लोकांना सोडलं. ज्या दोघांना सोडण्यात आलं त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा आहे. याबाबतचा भांडाफोड उद्याच्या पत्रकार परिषदेत मी करणार आहे.'

'त्या दोन लोकांना NCB कार्यालयात आणण्यात आले होते आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले. हे जाणीवपूर्वक करण्यात आलं. सगळा खरा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले का?' असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

'एनसीबीची कारवाईच बनावट'

ड्रग्स प्रकरणात करण्यात आलेली कारवाई ही बनावट असल्याचा दावा नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. याबाबत त्यांनी आरोप करतान असं म्हटंल होतं की, 'जेव्हा ड्रग्स प्रकरणात छापेमारी होते तेव्हा जप्त केलेल्या वस्तूंचा पंचनामा केला जातो. हा सगळा जप्तीचा माल कोणासमोरही उघडता येत नाही. फक्त कोर्टात मॅजिस्ट्रेटच्या समोर ते उघडलं जातं आणि लगेच सील केलं जातं.'

'पण ज्या पद्धतीने ड्रग्स असल्याचा दावा करणारे फोटो हे मीडियामध्ये देण्यात आले त्या व्हीडिओ आणि फोटो यातून हेच दिसतं की, या वस्तू क्रूझवर सापडलेल्या नाही. कारण त्या झोनल ऑफिसमध्येच दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरणच बनावट आहे.' असा आरोप मलिकांनी केला होता.

ncp nawab malik attack on sameer wankhede mumbai cruise drug case parambir singh sachin waze
क्रूझवरील ड्रग्स पार्टीत BJP नेत्याचा मेहुणा; पत्रकार परिषदेत व्हीडिओच दाखवणार: नवाब मलिक

दरम्यान, या सगळ्या प्रकरणात आता नवाब मलिकांच्या रडावर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे आले आहेत. त्यामुळे आता उद्याच्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक हे नेमका काय गौप्यस्फोट करतात याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in