Nawab Malik: उद्या सकाळी 10 वाजता अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार, नवाब मलिकांचं फडणवीसांना थेट आव्हान

NCP Nawab Malik Reaction Devendra Fadnavis allegations: देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला नवाब मलिक यांनी आता उत्तर दिलं आहे.
Nawab Malik: उद्या सकाळी 10 वाजता अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार, नवाब मलिकांचं फडणवीसांना थेट आव्हान
ncp nawab malik reaction devendra fadnavis allegations mumbai land transactions underworld hydrogen bomb

मुंबई: 'मुंबईत 1992 साली ज्यांनी मुंबईकरांच्या चिंधड्या उडवल्या त्यांच्यासोबत नवाब मलिक यांनी जमिनीचा व्यवहार केला आणि हा सगळा व्यवहार काळ्या पैशाचा आहे.' असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (9 नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. ज्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे.

यावेळी मलिक म्हणाले की, 'फडणवीस हे मुख्यमंत्री असताना कशाप्रकारे अंडरवर्ल्डच्या मदतीने राज्याला वेठीस धरलं होतं. याचा हायड्रोजन बॉम्ब उद्या सकाळी 10 वाजता मुंबईवर फोडणार आहे.' त्यामुळे आता नवाब मलिक हे फडणवीसांवर नेमका काय आरोप करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'उद्या सकाळी 10 वाजता फडणवीसांच्या अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब टाकणार'

'देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, आम्ही बॉम्ब फोडू.. पण त्यांचे फटाके भिजले आणि त्याचा आवाजही झाला नाही. आम्ही माफियाकडून जमीन खरेदी केली असा आरोप केला आहे. पण फडणवीसजी तुमचे टीपर हे खूपच कच्चे आहेत. तुम्हाला ते अर्धवट माहिती देतात. पण आता मी तुम्हाला सांगतो. उद्या सकाळी 10 देवेंद्र फडणवीस यांचा अंडरवर्ल्डशी काय संबंध आहे याची माहिती तुम्हाला देणार आहे.'

'देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, आम्ही बॉम्ब फोडू.. पण त्यांचे फटाके भिजले आणि त्याचा आवाजही झाला नाही. आम्ही माफियाकडून जमीन खरेदी केली असा आरोप केला आहे. पण फडणवीसजी तुमचे टीपर हे खूपच कच्चे आहेत. तुम्हाला ते अर्धवट माहिती देतात. पण आता मी तुम्हाला सांगतो. उद्या सकाळी 10 देवेंद्र फडणवीस यांचा अंडरवर्ल्डशी काय संबंध आहे याची माहिती तुम्हाला देणार आहे.'

ncp nawab malik reaction devendra fadnavis allegations mumbai land transactions underworld hydrogen bomb
नवाब मलिकांनी मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून कवडीमोलाने जागा का विकत घेतली?-फडणवीस

'फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे अंडरवर्ल्डशी कसे संबंध होते हे मी उद्या सांगणार आहे. त्यामुळे फडणवीसांबाबतचा अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब पडणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत थोडी वाट पाहा.' असं नवाब मलिक यांनी यावेळी म्हणाले.

अंडरवर्ल्डच्या साथीने फडणवीसांनी या शहराला वेठीस धरलं होतं..

'जिथवर अंडरवर्ल्डचा संबंध आहे. देवेंद्रजी अंडरवर्ल्डचा खेळ तुम्ही सुरु केा आहे. तर आपल्याला आत्ताच मी सांगतोय की... तुम्ही म्हणत होतात की, बॉम्ब फोडेन.. हा बॉम्ब नाही तर तुम्ही अवडंबर केलं फक्त.. पण नवाब मलिक उद्या सकाळी 10 वाजता अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब मुंबईत पाडणार आणि देशाला सांगेल की, देवेंद्र फडणवीस यांनी कशाप्रकारे अंडरवर्ल्डच्या मदतीने संपूर्ण शहराला वेठीस धरलं होतं.' असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.

'कशाप्रकारे अंडरवर्ल्डचा एक प्रमुख जो विदेशात बसून या शहरातून खंडणी वसुलीचं काम करायचा. तो नेमका कोणासाठी काम करायचा. तो अधिकारी कोणाचा खास होता. मी आपल्याला सांगू इच्छितो की, आज मी जे काही सांगितलं आहे ते सगळं आपल्या समोर आहे. पण उद्या सकाळी 10 वाजेपर्यंतची वाट पाहा. बॉम्ब तर फुटला नाही पण हायड्रोजन बॉम्ब उद्या सकाळी दहा वाजता पडणार.' असं थेट आव्हानच मलिकांनी फडणवीसांना दिलं आहे.

'मी आजही सांगतो.. तुम्ही चौकशी NIA, CBI कोणाकडेही द्या.. मी कोणत्याही चौकशीला तयार आहे. त्यांना वाटत असेल की, नवाब मलिक घाबरेल पण नवाब मलिक घाबरणार नाही.' असं म्हणत मलिक यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in