'माझ्या जावयाकडे गांजा सापडला नाही, ती तंबाखू होती.. NCB ला फरक समजतो की नाही', नवाब मलिकांचा सवाल

Nawab Malik attack on NCB: माझ्या जावयाकडे गांजा सापडला नाही, ती तंबाखू होती. त्यामुळे NCB ला काही फरक कळतो की नाही? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे.
'माझ्या जावयाकडे गांजा सापडला नाही, ती तंबाखू होती.. NCB ला फरक समजतो की नाही', नवाब मलिकांचा सवाल
ncp nawab malik son in law sameer khan bail clarification order says 200 kg marijuana not seized its herbal tobacco

मुंबई: 'माझ्या जावयाकडे गांजा सापडलाच नाही. जावयाच्या घरातून जे जप्त करण्यात आलं ते हर्बल तंबाखू होतं. हा माझा दावा नाही तर कोर्टाच्या ऑर्डरमध्ये तसं म्हटलं आहे. त्यामुळे एनसीबीला हर्बल तंबाखू आणि गांजा यातील फरक कळतो की नाही?' असा सवाल विचारत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी NCB वर गंभीर आरोप केले आहेत.

NCB कडून केल्या जाणाऱ्या कारवाया या बनावट आहेत. या संपूर्ण प्रकरणात माझ्या जावयाला नाहक अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. असं म्हणत नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. यावेळी कोर्टाने जामीन अर्ज मंजूर करताना असं म्हटलं होतं की, समीर खान यांच्याबाबत ड्रग्ज सिंडिकेटचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. याच मुद्द्यावर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या एकूण कार्यशैलीवर टीका केली आहे.

पाहा नवाब मलिक नेमकं काय म्हणाले:

200 किलो गांजा नाही तर हर्बल टोबॅको (तंबाखू) सापडला!

'छापेमारीत माझ्या जावयाकडे 200 किलो गांजा सापडला असा आरोप एनसीबीने लावला होता. पण साडेसात ग्राम गांजा हा फर्निचरवालाकडे मिळाला. बाकी सर्व गोष्टी या हर्बल टोबॅको (तंबाखू) होत्या. हे मी नाही म्हणत. तर कोर्टाच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे एनसीबीला तंबाखू आणि गांजामधला फरक कळत नाही याचं आश्चर्य वाटतं. खरं तर एनसीबी सारख्या संस्थांकडे अंमली पदार्थ आहेत की नाही हे तपासण्यासाठी एक विशिष्ट किट असतं. त्याचा वापर त्यांना छापेमारीत करता येतो' असं म्हणत नवाब मलिकांनी NCB च्या एकूण कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

'NCB बनावट कारवाया करतं'

'NCB बनावट कारवाया करतं हे या केसवरुन सिद्ध झालं आहे. माझ्या जावयाला अटक केल्यानंतर संपूर्ण देशभरातील मीडियामध्ये याच्या बातम्या चालत होत्या. पण या संपूर्ण काळात आम्ही कधीही दावा केला नाही की, माझे जावई हे निर्दोष आहेत. आम्ही कायम हेच म्हटलं की, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही.'

'पत्रकारांना NCB कडून काही फोटो दिले जातात. त्यावरुन काही बातम्या पेरल्या जातात. पण जेव्हा कोर्टात याबाबत काही सवाल विचारले जातात तेव्हा NCB याबाबतच्या गोष्टींचं खापर तुमच्यावर फोडतं. मी तुम्हाला पुन्हा सांगतो. जी ऑर्डर आली आहे. त्यामध्ये स्पष्ट झालं आहे की, माझ्या जावयाला फ्रेम करण्यात आलं आहे.'

ncp nawab malik son in law sameer khan bail clarification order says 200 kg marijuana not seized its herbal tobacco
ड्रग्ज सिंडिकेटचा पुरावा नाही! नवाब मलिक यांच्या जावयाला जामीन देताना कोर्टाच्या आदेशात उल्लेख

'मला जावयाबाबत प्रश्न विचारण्यात आले, म्हणून मी...'

'भाजपचे अनेक नेते हे माझ्या जावयाबाबत प्रश्न विचारत होते. आपण ही मला जावयाबद्दल प्रश्न विचारत होते. पण काल जी कोर्टाची ऑर्डर आली त्यानंतर त्याला चुकीच्या पद्धतीने फ्रेम केलं गेलं. या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. याबाबत आम्ही कोर्टात जाणार आहोत. हे एकच प्रकरण आहे. अशी डझनभर प्रकरणं आहेत ज्यामध्ये NCB ने बनावट कारवाई करते.' असं म्हणत नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा NCB वर निशाणा साधला आहे.

Related Stories

No stories found.