Drug Case: समीर वानखेडेंबाबत शरद पवारांनी उपस्थित केला 'हा' गंभीर सवाल

Sharad Pawar on Drug Case: सध्या गाजत असलेल्या ड्रग्स केस प्रकरणी शरद पवार यांनी NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत काही गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
Drug Case: समीर वानखेडेंबाबत शरद पवारांनी उपस्थित केला 'हा' गंभीर सवाल
ncp sharad pawar raised serious question about ncb officer sameer wankhade(फाइल फोटो)

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (13 ऑक्टोबर) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी केंद्रातील भाजप सरकार विविध केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत असल्याचं म्हणत पवारांनी हल्लाबोल केला. याचवेळी मुंबई NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याबाबत काही गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यापासून समीर वानखेडे हे खूपच चर्चेत आले आहेत. मात्र, क्रूझवरील छापा प्रकरण हे मुळातच बनावट असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने केला जात आहे. यातच आता शरद पवारांनी समीर वानखेडेंबद्दल देखील काही सवाल उपस्थित केले आहे.

क्रूझ ड्रग्स प्रकरणात केपी गोसावी या साक्षीदारावरुन NCB ला सातत्याने सवाल विचारले जात आहे. मागील काही दिवसापासून गोसावी हा फरार असल्याचं बोललं जात आहे. 'जर अशा व्यक्तीची पंच म्हणून समीर वानखेडे निवड करत असतील तर या अधिकाऱ्याचं असोसिएशन कुठल्या प्रकारच्या लोकांशी आहे हे त्यावरुन स्पष्ट होतं.' असं म्हणत पवारांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला आहे.

पाहा शरद पवार ड्रग्स प्रकरण आणि समीर वानखेडेंबाबत काय म्हणाले:

'नवाब मलिक यांनी एका अधिकाऱ्याबाबत काही गोष्टी सांगितल्या. मी देखील केंद्रात काम केलेलं असल्याने त्या वानखेडे या अधिकाऱ्यांबाबत काही माहिती घेतली. ते आधी विमानतळावरील अधिकारी होते. तिथल्या सुद्धा काही कथा मला ऐकायला मिळाल्या. पण त्यावर आताच काही मी बोलणार नाही.'

'पण इथे काय झालं की, साधारण कुठे काही गुन्हा घडला तर पोलीस किंवा एजन्सी हे आधी पंचनामा करतात. ही साधारणत: पद्धत आहे. अधिकारी जी कारवाई करत असतात ती योग्य आहे. अशी खात्री वाटावी अशा स्वरुपाचे हे पंच असले पाहिजे.'

'आता असं दिसतंय की, केपी गोसावी ज्यांची पंच म्हणून किंवा साक्षीदार म्हणून निवड करण्यात आली होती ते सध्या फरार आहेत. आता पंच म्हणून ज्याची निवड केलेली आहे ती व्यक्ती जर नंतर येऊ सुद्धा शकत नाही, समोर जाण्यास तयार नाही. पोलिसांसमोर जाण्यास तयार नाही. नार्टोकिक्स ब्युरोमध्ये भेटत नाही. याचा अर्थ त्यांच्या प्रामाणिकपणाबाबत संशय घेतला जाऊ शकतो.'

'मात्र, त्यापेक्षाही मला चिंता ही आहे की, पंच म्हणून अशा व्यक्तीची निवड केली याचा अर्थ या अधिकाऱ्याचं असोसिएशन कुठल्या प्रकारच्या लोकांशी आहे हे त्यावरुन स्पष्ट होतं. म्हणून हे पंच कोण आहेत, कुठे आहेत याबाबतचं चित्र अद्यापही स्पष्ट नाही.'

ncp sharad pawar raised  serious question about ncb officer sameer wankhade
'शरद पवार सलग पाच वर्षे एकदाही मुख्यमंत्री राहिले नाहीत'; पवारांना फडणवीसांची कोपरखळी

'पण दुसरी गोष्ट अशी की, याठिकाणी काही आरोप केले गेले. आता त्या आरोपांवर एजन्सीने काही खुलासा केला तर ते मी समजू शकतो. पण अशा प्रकाराचे आरोप केल्यानंतर त्याचा खुलासा करायला सगळ्यात पहिल्यांदा भाजपचे नेते पुढे येत आहेत. मला काही कळलं नाही. ही जबाबदारी, हे कंत्राट त्यांनी कधीपासून घेतलं?' असं म्हणत शरद पवार यांनी समीर वानखेडे यांच्यासह भाजपवर देखील निशाणा साधला.

मुद्दा हा आहे की, सत्तेचा गैरवापर कुणाकडून होत असेल आणि विशेषत: शासकीय यंत्रणेकडून तर त्या गैरवापर करणाऱ्या लोकांचं समर्थन हे भाजपचे लोक करत आहेत. ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.

Related Stories

No stories found.