Udayanraje Bhosale: ‘संभाजीराजे माझे भाऊ, आमच्यात मतभेद नाही’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा: संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आज राज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek din 2021) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रायगडावर कोल्हापूरच्या गादीचे संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला.

साताऱ्यात (Satara) छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या हस्ते जलमंदीर पॅलेसमध्ये विधिवत राज्याभिषेक सोहळा पार पडला.

यावेळी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलताना उदयनराजे यांनी संभाजीराजे (Sambhajiraje) यांच्या आंदोलनाला एक प्रकारे पाठिंबाच दिला आहे. ‘संभाजीराजेंनी माझे भाऊच आहेत. त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेशी विसंगती असण्याचं कारण नाही.’ असं उदयनराजे म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Shivrajyabhishek Din 2021 : शिवराज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न

‘आम्ही तिन्ही राजे कुटुंब म्हणून एकत्र आहोत. आधी सरकारने आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. सरकारला तेच सांगून कंटाळा आला आहे.’ असंही उदयनराजे यांनी यावेळी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

हा सोहळा पार पडल्यानंतर उपस्थित पत्रकारांशी बोलत असताना उदयनराजेंनी सध्या मराठा आरक्षण आणि इतर मुद्द्यांवरुन विविध समाजांमध्ये तयार झालेली तेढ यावर भाष्य केलं. ‘जर आपण शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणले नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.’ असं भाष्य केलं.

ADVERTISEMENT

“आताचे पक्ष फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेताना दिसतात पण त्यांचे विचार आचरणात आणण्याची वेळ येते तेव्हा असं काही होताना दिसत नाही. शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात सर्व जाती-धर्माचे, १८ पगड जातीचे लोकं एकत्र होते, त्यांच्यात एकोपा होता. मग आजच आपल्यात एवढा तेढ का निर्माण झालाय? यावर विचार करायला हवा.”

Shivrajyabhishek Din 2021 : रायगडावर आई शिरकाईचा गोंधळ

आताची लोकशाही ही छत्रपतींना अपेक्षित असणारी लोकशाही नक्कीच नाही. शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेऊन चालणार नाही, त्यांचे विचार आचरणात आणले जात नसतील तर देशाचे तुकडे व्हायला फार वेळ लागणार नाही, असंही उदयनराजे म्हणाले.

जलमंदीर पॅलेसमध्ये उदयनराजे भोसलेंच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं विधीवत पूजन करुन त्यांना वंदन करण्यात आलं. राज्याभिषेकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी १८ पगड जातीतील लोकांना एकत्र आणून जुलमी राजवटीला आव्हान दिलं. आजचा दिवस हा भारतासाठी पहिला स्वातंत्र्यदीन असल्याचंही उदयनराजेंनी म्हटलंय.

भारतात असे अनेक राजे दिसतील की ज्यांनी स्वतःला राजे म्हणून मिरवून घेतलं. पण शिवाजी राजेंनी कधीही स्वतःला राजे म्हणून मिरवलं नाही. पूर्वीच्या काळात असलेली लोकशाही आता राहिलेली नाही. पुर्वी गुण्या-गोविंदाने राहणारी माणसं आता वेगळी झाली आहेत, त्यांच्यात दरी निर्माण करण्यात आली याचा विचार सर्वांनी करायला हवा असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT