Babasaheb Purandare: माणूस म्हणून कधीच विरोध केला नाही, काही लिखाणावर आक्षेप होता: आव्हाड

jitendra awhad tweet after babasaheb purandare passed away: राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे. पाहा नेमकं काय म्हटलंय.
Babasaheb Purandare: माणूस म्हणून कधीच विरोध केला नाही, काही लिखाणावर आक्षेप होता: आव्हाड
never objected as a man there was an objection to some writing jitendra awhad tweet babasaheb purandare passed away

मुंबई: पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. दरम्यान, आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. मात्र, यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलं आहे की, 'माणूस म्हणून कधीच विरोध केला नाही काही लिखाणावर आक्षेप होता.' असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं नेमकं ट्विट काय?

'माणूस म्हणून कधीच विरोध केला नाही काही लिखाणावर आक्षेप होता. ब.मो.पुरंदरे ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...'

जेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांना 2015 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता तेव्हा विरोधात असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी तत्कालीन फडणवीस सरकार आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या या पुरस्काराला प्रचंड विरोध केला होता.

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला पुरस्कार रद्द करण्यात यावा अशी मागणी देखील आव्हाडांनी केली होती. दुसरीकडे रस्त्यावर उतरुन त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंविरोधात निषेधही व्यक्त केला होता.

तसंच जेव्हा बाबासाहेबांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला होता तेव्हा देखील आव्हाडांनी बाबासाहेब पुरंदरेंवर अत्यंत घणाघाती टीका केली होती.

पाहा जितेंद्र आव्हाडांनी नेमकी काय केली होती टीका?

'छत्रपतींच्या इतिहासासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराजांची बदनामी करणाऱ्याला सरकार पोसतंय, असं विधानही आव्हाडांनी त्यावेळी केलं होतं. पुरंदरेंना सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्यात आल्याची भावना आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली.

‘महाराष्ट्र भूषण दिला तेव्हाही आम्ही हेच सांगत होतो की, ज्यांनी जिजाऊंची, छत्रपतींची बदनामी केली त्यांना का मोठं केलं जात आहे? सरकारन त्यांना का पोसताय? जेम्स लेन म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे. त्यांनीच जेम्स लेनला माहिती पुरवली होती. सोलापुरात त्यांनी जेम्स लेनच्या पुस्तकाचं कौतुकही केलं होतं.'

'महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्या पुरंदरेंना पुरस्काराने गौरविण्यात येत असेल तर हे पुरस्कार कोणत्या माध्यमातून दिले जातात याबाबत सर्वसामान्य जनतेच्या मनात शंका निर्माण करणारं आहे. आम्ही या पुरस्काराच्याविरोधात महाराष्ट्रात वैचारिक आग लावू.' असंही जितेंद्र आव्हाड त्यावेळी म्हणाले होते.

नेमका राजकीय विरोध काय होता?

जेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देऊ नये यासाठी विरोध सुरु होता तेव्हा बाबासाहेबांच्या समर्थकांनी त्यावेळी असं म्हटलं होतं की, 'बाबासाहेब हे केवळ ब्राम्हण असल्यानेच या पुरस्कारला विरोध केला जात आहे.' त्यांच्या समर्थकांचं मते बाबासाहेब यांचं शिवरायांचा इतिहास लोकांपर्यंत नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

मात्र, या सन्मानाला विरोध करणाऱ्यांचे म्हणणे होते की, त्यांनी त्यांच्या साहित्यात शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेल्या चुकीच्या गोष्टी हेच या निषेधाचे कारण आहे.

never objected as a man there was an objection to some writing  jitendra awhad tweet babasaheb purandare passed away
Babasaheb Purandare: बाबासाहेब पुरंदरेंना 'महाराष्ट्र भूषण' देण्यावरून का झाला होता वाद, कोणी केला होता विरोध?

कोणी-कोणी केला होता बाबासाहेबांना पुरंदरेंना विरोध?

पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, संभाजी ब्रिगेड, काही साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in