Corona Variant : दक्षिण आफ्रिकेत आढळला नवा व्हेरिएंट; केंद्राने सर्व राज्यांना केलं 'अलर्ट'

ब्रिटनने सहा आफ्रिकन देशातील विमानसेवा केली रद्द : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा B.1.1.529 हा विषाणू आढळून आला असून, तो खूप धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे.
Corona Variant : दक्षिण आफ्रिकेत आढळला नवा व्हेरिएंट; केंद्राने सर्व राज्यांना केलं 'अलर्ट'
दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या विषाणूचा अभ्यास केला जात आहे..Aaj Tak

कोरोनाच्या दोन तडाख्यानंतर सावरत असतानाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने झोप उडवली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळून आला असून, तो गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भारतही सर्तक झाला असून, सर्व राज्यांना अर्लट राहण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत. दुसरीकडे ब्रिटनने सहा आफ्रिकन देशातील विमान सेवा रद्द केली आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा B.1.1.529 हा नवीन व्हेरिएंट आढळून आला आहे. आफ्रिकेतील शास्त्रज्ञांना हा व्हेरिएंट आढळून आला असून, म्युटेशनची ही अत्यंत दुर्मिळ रचना असल्याचे दिसून आलं आहे. आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे भारत सतर्क झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या विषाणूचा अभ्यास केला जात आहे..
Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन व्हेरिएंट किती धोकायदायक? लस प्रभावी आहे का?

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी तातडीने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र पाठवलं आहे. 'अलिकडेच आढळून आलेल्या नव्या व्हेरिएंटमुळे प्रचंड वेगाने म्युटेशन होत असल्याची माहिती आहे. अलिकडेच व्हिसावरील प्रतिबंध आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध खुले करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर या व्हेरिएंटमुळे देशातील सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम संभवतात,' असं केंद्राने म्हटलं आहे.

नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर व्हेरिएंट आढळून आलेल्या देशातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग आणि चाचण्या करणं अत्यावश्यक आहे. या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणं आणि त्यांच्या चाचण्या करण्यात याव्यात, असंही केंद्राने राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना म्हटलं आहे. नवा व्हेरिएंट आढळून आलेल्या रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिग लॅबमध्ये पाठवण्याच्या सूचनाही राज्यांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिव यांना देण्यात आल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या विषाणूचा अभ्यास केला जात आहे..
नव्या व्हेरिएंटचा धसका! राज्यात नव्याने निर्बंध; महाराष्ट्र सरकारने काढलेल्या आदेशात काय?

ब्रिटनने सहा आफ्रिकन देशातील विमानसेवा रोखली

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या नव्या व्हेरिएंटनंतर ब्रिटनने सहा आफ्रिकन देशांसोबतची विमानसेवा अनिश्चित काळासाठी रद्द केली आहे. त्याचबरोबर ब्रिटनच्या 'युके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी'ने (UKHSA) कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला अंडर इन्व्हेस्टिगेशन म्हणून घोषित केलं आहे.

UKHSA कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा अभ्यास करत आहे. मात्र, त्यासाठी अजून माहिती गरज आहे. असं असलं तरी आम्ही सध्या काळजी घेत आहोत. 6 आफ्रिकन देशांना रेड लिस्टच्या यादीत टाकलं जाईल आणि तेथून येणारी विमानं अनिश्चित काळासाठी बंद केली जाईल. इतकंच नाही, तर ब्रिटनमध्ये येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाईन व्हावं लागेल, असं ब्रिटनचे आरोग्य सचिव साजिद जावीद यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in