'निर्लज्ज'! नितेश राणेंनी 'त्या' घटनेचा व्हिडीओ ट्वीट करत 'आघाडी'वर साधला निशाणा
नितेश राणे यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओतील दृश्ये..

'निर्लज्ज'! नितेश राणेंनी 'त्या' घटनेचा व्हिडीओ ट्वीट करत 'आघाडी'वर साधला निशाणा

Maharashtra bandh Updates : 'मावळ्यांचे सरकार पाहिजे की मावळ्यांवर गोळीबार करणारे?'

लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बदंला भाजपने विरोध दर्शवला असून, सकाळीच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसक घटनेत शेतकऱ्यांना गाडीने उडवण्यात आलं. या घटनेत चार शेतकऱ्यांसह 8 जण मरण पावले आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार टीकेचं धनी ठरलं असून, लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं बंदची हाक दिली.

महाविकास आघाडीकडून पाळण्यात येणाऱ्या या बंदला भाजपने विरोध केला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मावळ येथे शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या गोळीबाराचा व्हिडीओ ट्वीट करत बंदवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओतील दृश्ये..
Maharashtra Bandh: 'बंद'मध्ये आम्हाला खेचू नका म्हणणारे व्यापारी देखील होणार बंदमध्ये सहभागी!

पोलीस शेतकऱ्यांवर गोळीबार करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. तसंच संतप्त शेतकऱ्यांनी वाहनं जाळल्याची आणि शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची विदारक दृश्येही व्हिडीओमध्ये दिसत आहे.

या व्हिडीओच्या शेवटी 'मावळ्यांचे सरकार पाहिजे की मावळ्यांवर गोळीबार करणारे?' असा प्रश्नही उपस्थित केलेला आहे. हा व्हिडीओ ट्वीट करताना नितेश राणे यांनी टीकाही केली आहे. ज्यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, आशा आहे त्यांना हे आठवत असेल... निर्लज्ज', असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

नितेश राणे यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओतील दृश्ये..
Maharashtra Bandh : आज 'महाराष्ट्र बंद'! काय सुरु आणि काय असणार बंद?

काय आहे मावळ गोळीबार प्रकरण?

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला पवना धरणातून बंद पाइपलाइनमधून पाणी पुरवठा करण्यास मावळमधील 72 गावांतील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. सदर योजना राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हट्टाने पुढे रेटली जात आहे, असा आरोप आंदोलकांनी केला होता. त्या पाइपलाइनला विरोध करण्यासाठी भाजप, शिवसेना, रिपाइं आणि भारतीय किसान सभेनं पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बऊर येथे मोर्चा काढला होता. त्याला हिंसक वळण लागले व नंतर पोलिसांनी गोळीबार केला. यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

Related Stories

No stories found.