Health Index : आरोग्य सेवा देण्यात केरळ अव्वल, तर उत्तर प्रदेश तळाला; महाराष्ट्र कितव्या स्थानी?

नीति आयोगाने हेल्थ इंडेक्स अर्थात आरोग्य सेवा पुरवणाऱ्या राज्यांची यादी जाहीर केली आहे. यात आरोग्य सेवा देण्यात केरळने पहिला क्रमांक पटकावला असून उत्तर प्रदेश 19व्या क्रमांकावर आहे...
Health Index : आरोग्य सेवा देण्यात केरळ अव्वल, तर उत्तर प्रदेश तळाला; महाराष्ट्र कितव्या स्थानी?
रुग्णाची चौकशी करताना करताना डॉक्टर. (प्रातिनिधीक छायाचित्र)पीटीआय

नीति आयोगाने सोमवारी हेल्थ इंडेक्स जाहीर केली. यामध्ये देशाच्या दक्षिणेकडील राज्यांनी बाजी मारली असून, उत्तरेकडील राज्यांमध्ये आरोग्य सुविधांची परिस्थिती खराब असल्याचं समोर आलं आहे. नीति आयोगाच्या हेल्थ इंडेक्सनुसार चांगल्या आरोग्य सेवा देणाऱ्या राज्यांमध्ये केरळने पहिला क्रमांक पटकावला आहे.

देशातील कोणत्या राज्यात चांगल्या आरोग्य सेवा पुरवल्या जातात, याबद्दलची यादी नीति आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडून आहे. सगळ्या खराब सेवा देणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारचा क्रमांक आहे. यात बिहार 18 व्या क्रमांकावर असून, उत्तर प्रदेश 19 व्या क्रमांकावर आहे.

रुग्णाची चौकशी करताना करताना डॉक्टर. (प्रातिनिधीक छायाचित्र)
Omicron : पुढचे दोन आठवडे महाराष्ट्रासाठी आव्हानात्मक, कोव्हिड टास्क फोर्सने असं का म्हटलं आहे?

महाराष्ट्र कितव्या स्थानी?

नीति आयोगाने जाहीर केलेल्या हेल्थ इंडेक्समध्ये केरळ आणि तामिळनाडू अनुक्रमे पहिला व दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर तेलंगाना असून, चौथा क्रमांक आंध्र प्रदेशचा आहे. तर महाराष्ट्राला पाचवे स्थान मिळाले असून, चांगल्या आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र टॉप फाईव्हमध्ये आहे.

महाराष्ट्रानंतर सहाव्या क्रमांकावर गुजरात, सातव्या क्रमांकावर हिमाचल प्रदेश, आठव्या क्रमांकावर पंजाब, नवव्या क्रमांकावर कर्नाटक, दहाव्या क्रमांकावर छत्तीसगढ, 11व्या क्रमांकावर हरयाणा, 12व्या क्रमांकावर आसाम, 13व्या क्रमांकांवर झारखंड, 14व्या क्रमांकावर ओडिशा, 15व्या क्रमांकावर उत्तराखंड, 16व्या क्रमांकावर राजस्थान, 17व्या क्रमांकावर मध्य प्रदेश, 18व्या क्रमांकावर बिहार, तर 19व्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे.

चांगल्या आरोग्य सेवा देणाऱ्या छोट्या राज्यांमध्ये मिझोरामने पहिला क्रमांक मिळवला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर त्रिपुरा आहे. नागालँड सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. केंद्र शासित प्रदेशांमध्ये दादरा-नगर-हवेलीने अव्वल क्रमांक मिळवला आहे. तर चंदीगढ दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली 5व्या क्रमांकावर आहे.

चार टप्प्यात करण्यात आला सर्वे

नीति आयोगाच्या माहितीप्रमाणे हेल्थ इंडेक्ससाठी सर्व राज्यांचे चार टप्प्यात सर्वे करण्यात आले. चार टप्प्यांमधून गुण देण्यात आले. चारही टप्प्यांमध्ये केरळ पहिल्या क्रमांकावर राहिले. केरळला 82.20 गुण मिळाले. तर दुसऱ्या क्रमांकावरील तामिळनाडूला 72.42 गुण मिळाले आहेत. यादीत सर्वात खाली असलेल्या उत्तर प्रदेशला 30.57 गुण मिळाले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in