शिवसेना काल, आज आणि उद्या… ‘त्या’ बॅनरनंतर मनसेने केला फोटो व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज ठाकरेंनी केलेल्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर आणि त्यानंतर घेतलेल्या उत्तर सभेनंतर शिवसेना विरूद्ध मनसे हा संघर्ष तीव्र होताना दिसतो आहे. गुरूवारी शिवसेना भवन परिसरात राज ठाकरे यांच्याविरोधात बॅनर लागले होते. त्यामध्ये राज ठाकरेंचा मुस्लिम धर्मीय टोपी घातलेला फोटो होता. तसंच राज ठाकरे काल, आज आणि उद्या असा उल्लेख करण्यात आला होता. त्याला आता मनसेने उत्तर दिलंय.

राज ठाकरे काल, आज आणि उद्या? मुंबईतल्या दादरमधलं बॅनर चर्चेत

मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एक फोटो व्हायरल केला जात आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करणारे बॅनर्स शिवसेना भवन परिसरात लागल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काल, आज आणि उद्या ? असे फोटो व्हायरल केले जात आहेत…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरील भोंग्यांबाबात आक्षेप घेतला होता. भोंगा न उतरवल्यास मशीदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. यावरुन मविआच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. आता पुन्हा राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करणारे बॅनर्स शिवसेना भवन परिसरात लागले आहेत. यात राज ठाकरेंचा एक फोटो आहे, ज्यात त्यांनी मुस्लिम धर्मीयांची टोपी प्रधान केली आहे. दुसऱ्या फोटोत हनुमान असं लिहिण्यात आलंय, तर तिसऱ्या फोटोत प्रश्नचिन्ह दाखवण्यात आले आहे. आता यालाच मनसेने उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो शेअर केले आहेत. यात पण काल, आज आणि उद्या ? असे शीर्षक देण्यात आले आहे. आता हा फोटो शेअर केल्यामुळे मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेला डीवचले आहे.

काय आहे फोटो मध्ये ?

ADVERTISEMENT

काल उद्धव ठाकरे हे बाळासाहेब यांच्यासोबत होते. तर आज उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सोबत आहेत आणि उद्या कोणा सोबत अशा आशयाचा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसंच आणखी एक फोटो व्हायरल होतो आहे. ज्यामध्येही काल, आज आणि उद्याची शक्यता असं दाखवण्यात आलं आहे. काल या नावाखाली बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा फोटो आहे. आज या नावाखाली सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. तर उद्याची शक्यता या नावाखाली आदित्य ठाकरे MIM सोबत दाखवण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

दादरमधल्या बॅनरमध्ये नेमकं काय?

मुंबईतल्या दादर भागात बॅनर लावण्यात आलं आहे. यामध्ये काल-आज आणि उद्या? असे तीन शब्द लिहिण्यात आले आहेत. काल या मथळ्याखाली राज ठाकरे यांचा मुस्लिम टोपी घातलेला फोटो लावण्यात आला आहे. आज या मथळ्याला भगवा रंग देऊन त्यावर पांढऱ्या अक्षरात हनुमान असं लिहिण्यात आलं आहे. तर उद्या हा बॅनर पांढरा आहे त्यावर काळ्या अक्षरात चार प्रश्नचिन्हं दाखवण्यात आली आहेत.

या बॅनरला आता मनसेने प्रत्युत्तर दिलं असून तसेच काल, आज आणि उद्याबाबतचे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT