
भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. मागच्या चोवीस तासात 1 लाख 17 हजार 100 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुधवारच्या तुलनेत गुरूवारी रूग्णसंख्येत 28 टक्के वाढ झाली आह. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचेही रूग्ण वाढत आहेत. देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 3007 रूग्ण झाले आहेत.
ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या लक्षणांबाबत वारंवार आरोग्य तज्ज्ञ माहिती देत आहेत. खोकला, ताप, नाक वाहणे, कफ ही चार लक्षणं आहेत. अशात आता एम्सने पाच लक्षणं सांगितली आहेत. तसंच ही लक्षणं दिसली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा असंही एम्सने सांगितली आहेत.
काय आहेत पाच लक्षणं?
श्वास घेण्यासाठी त्रास होणं
ऑक्सिजनची पातळी सातत्याने कमी होणं
छातीत सातत्याने दुखणे, दबाव जाणवणे
मानसिक ताण, प्रतिक्रिया न देता येणं, व्यक्त न होता येणं
ही लक्षणं चार दिवसांपेक्षा जास्त असतील तर तातडीने डॉक्टरांकडे जा
आरोग्य तज्ज्ञांनी हे देखील सांगितलं आहे की त्वचा, ओठ, नखांचा रंग बदलला तरीही सावध व्हा. तातडीने डॉक्टरांकडे संपर्क साधा असंही सांगण्यात आलं आहे.
कोरोनाची चाचणी कधी करावी?
जर कोरोना झाला आहे याबाबत जर कुणी माहिती दिली तर त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने पाच दिवसात काही लक्षणं दिसली तर चाचणी करावी. ज्या कुणाला लक्षणं दिसतील त्यांनी क्वारंटाईन व्हावं. तसंच चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत क्वारंटाईन रहावं.
इलिनॉस डिपार्टमेंट ऑफ पब्लिस हेल्थचे संचालक डॉ. नगोजी इजीके यांनी सांगितलं आहे की संक्रमित झाल्यानंतरची लक्षणं आणि आधीची लक्षणं वेगळी असू शकतात. लवकर टेस्ट करणं चांगलं ठरतं असंही त्यांनी सांगितलं आहे
कोव्हिडची चाचणी निगेटिव्ह आली तरीही असं समजू नका की तुम्ही निगेटिव्ह आहात. टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही जर घसा खवखवणं, डोकेदुखी, ताप, अंगदुखी होते आहे तर काही दिवस जाऊ देऊन पुन्हा टेस्ट करावी
जर आपण एखाद्या कोव्हिड झालेल्या रूग्णाच्या संपर्कात आलो आहोत असं कुणाला वाटत असेल आणि जर त्या व्यक्तीने लस घेतली नसेल तर त्या व्यक्तीने तातडीने क्वारंटाईन होण्याची गरज आहे
मुंबई महापालिकेने आणलेली नवी नियमावली काय आहे?
रूग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर किमान सात दिवस क्वारंटाईन करावं लागणार. सात दिवस पूर्ण होईपर्यंत शेवटचे तीन दिवस ताप न आल्यास क्वारंटाईन कालावधी संपणार आहे
शेवटच्या तीन दिवसात जर ताप आला तर मात्र क्वारंटाईनचा कालावधी वाढणार आहे.
क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतरही मास्क लावणं, कोव्हिड प्रतिबंधत्मक वर्तन पाळणं महत्त्वाचं असणार आहे
अति जोखमीच्या गटातील व्यक्तींचा कालावधीही सात दिवसांनी पूर्ण होणार आहे. मात्र या कालावधीत त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं आढळून आल्यास पाचव्या किंवा सातव्या दिवशी चाचणी करावी लागणार आहे.
तीन दिवस सलग 100 अंश किंवा त्यापेक्षा जास्त ताप असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा
श्वास घ्यायला त्रास होत असेल तरीही डॉक्टरांशी संपर्क साधा
ऑक्सिजनचं प्रमाण 93 टक्के किंवा कमी असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा
सतत छातीत दुखत असल्यास, रूग्णाचा मानसिक ताण किंवा थकवा जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा