Covid ची महामारी कशी संपू शकते? Who च्या प्रमुखांनीच दिलं उत्तर, म्हणाले...

Covid ची महामारी कशी संपू शकते? Who च्या प्रमुखांनीच दिलं उत्तर, म्हणाले...

कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचं संकट जगावर घोंगावतं आहे. जगभरात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. मागच्या चोवीस तासात देशात 1 लाख 94 हजार 720 नवे रूग्ण आढळले आहेत. तर कोरोना टेस्ट पॉझिटिव्हिटीचा हा दर हा 11.05 टक्के झाला आहे. ओमिक्रॉन या व्हेरिएंटने ग्रासलेले देशभरात 4868 रूग्ण आहेत. अशात कोरोनाची तिसरी लाट आलेली असताना WHO ने पुन्हा एकदा जगभरातल्या देशांनी लसीकरणावर जोर द्यावा असं म्हटलं आहे.

कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी. (प्रातिनिधीक छायाचित्र)
कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी. (प्रातिनिधीक छायाचित्र)PTI

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO चे प्रमुख ट्रेडोस एडनॉम यांनी हे सांगितलं की कोरोनाला हरवणं सहज शक्य आहे. पण त्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे. जगाने या दोन्ही गोष्टी केल्या तर कोरोनाचा नायनाट होऊ शकतो. पहिली बाब ही की ज्या देशांमध्ये अजूनही लसी पोहचललेल्या नाही तिथे कोरोनाचा धोका जास्त आहे. त्या देशांना लसी पोहचवण्यात याव्यात. तर दुसरी बाब ही आहे की लोकांना लस घेण्यासाठी आवश्यक असलेली साधनं उपलब्ध करून देणं. जोपर्यंत जगातला प्रत्येकजण सुरक्षित नाही तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही असंही ट्रेडोस यांनी स्पष्ट केलं.

WHO चे प्रमुख म्हणाले की, 'जगात आता असा एकही देश नाही ज्या देशात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. प्रत्येक देशात कोरोना पसरला आहे. लसीकरणातली असमानता जेवढी असेल तेवढी कोरोनाच्या व्हायरसची जोखीम वाढत जाईल. अनेक गरीब देशांमध्ये लस पोहचलेली नाही ही बाब चिंतेची आहे, काळजीत भर घालणारी आहे असंही ट्रेडोस यांनी म्हटलं आहे. जर ही असमानता संपवण्यात आपल्याला यश मिळालं तर संपूर्ण जगातून कोरोनाचा नायनाट करणं सोपं आहे असंही ट्रेडोस यांनी म्हटलं आहे. अनेक गरीब देशांमध्ये लसीकरण एवढ्या चांगल्या प्रमाणात होत नाही जेवढ्या तुलनेत श्रीमंत देशांमध्ये केलं जातं आहे ही बाब खरंच टेन्शन वाढवणारी ठरू शकते असंही त्यांनी म्हटलं आहे.

Covid ची महामारी कशी संपू शकते? Who च्या प्रमुखांनीच दिलं उत्तर, म्हणाले...
Omicron वेगाने का पसरतोय? WHO ने सांगितली 'ही' तीन कारणं

WHO चे प्रमुख म्हणाले की कोरोना महामारीचं हे तिसरं वर्ष आहे. जर आपण सगळ्यांनी मिळून या महामाराचा मुकाबला केला तर मला ही खात्री वाटते की आपण सगळे मिळून ही महामारी संपवू शकतो. 2022 च्या मध्यापर्यंत सगळ्या देशांनी जर 70 टक्के लसीकरण पूर्ण केलं तर चांगले बदल घडू शकतात. ही महामारी संपवण्याच्या दृष्टीने ते एक मोठं पाऊल असेल. WHO चे प्रमुख असंही म्हणाले की 2022 मध्ये आपण यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे की जास्तीत जास्त देश लस घेणारे देश कसे ठरतील. त्यासाठीची आवश्यक साधनंही आपण त्यांना पुरवली पाहिजेत.

लसीकरणाच्या बाबतीत देशांमध्ये असणारी तफावत दूर करण्यासाठी जर जगातले सगळेच दिग्गज एकत्र आले तर आपण या समस्येवर काही नाही काही तरी उपाय नक्की योजू शकतो. अनेक ठिकाणी देशांची लोकसंख्या जास्त आणि लसींची संख्या कमी आहे त्यामुळे लसीकरण मोठ्या प्रमाणावर होऊ शकलेलं नाही. काही श्रीमंत देशांनी मात्र बुस्टर डोस देण्यासही सुरूवात केली आहे. हीच ती तफावत आहे जी मिटवणं अत्यंत आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in