Omicron update : अमेरिकेत डेल्टापेक्षाही ओमिक्रॉन ठरतोय जीवघेणा! एका दिवसात 2,267 मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे अमेरिकेत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ओमिक्रॉनने अमेरिकेत थैमान घातलं असून, प्रचंड वेगाने पसरणारा हा व्हेरियंट जीवघेणा ठरू लागला आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटने अमेरिकन प्रशासनाच्या चिंतेत भर घातली आहे. अमेरिकेमध्ये डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉनमुळे जास्त मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे.

अमेरिकीतील कोरोना आकडेवारी नजर टाकल्यास डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरियंटने कहर केला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार झाल्यानंतर म्हणजेच नोव्हेंबर 2021 पासून दररोज कोरोना मृतांची संख्या वाढत आहे.

ओमिक्रॉन व्हेरियंटचा वेगानं प्रसार होत असतानाच अमेरिकेत गुरुवारी 2,267 रुग्णांचा मृत्यू झाला. डेल्टा व्हेरियंटमुळे आलेल्या कोरोना पीकच्या काळातील मृतांच्या संख्येपेक्षा ही संख्या खूप जास्त आहे. अमेरिकेत सप्टेंबर 2021 मध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे रुग्णसंख्येनं उच्चांक (कोरोना पीक) गाठला होता. त्या काळात अमेरिकेत एका दिवसांत सर्वाधिक 2,100 मृत्यूंची नोंद झाली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अमेरिकेत सध्या कोरोनाचा वेगाने प्रसार होत असून, बुहतांश रुग्ण हे ओमिक्रॉनबाधित असल्याचं दिसत आहे. मागील संशोधन अहवालामध्ये ओमिक्रॉनला कमी धोकादायक असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र, कोरोनाच्या इतर व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरियंट जास्त लोकांना आजारी पाडत आहे.

जगामध्ये सर्वाधिक कोरोना मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे 8.78 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. ओमिक्रॉनमुळे अमेरिकेत एका लाखाहून अधिक मृत्यू होतील, असं मत अमेरिकेतील इरवीन शहरातील कॅलिफोर्निया विद्यापिठाचे प्राध्यापक अंड्र्यू नोयमर यांनी नोंदवलं आहे.

ADVERTISEMENT

‘जेव्हा ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरूवात होईल, त्यावेळी आपण वेगळं काय करू शकलो असतो, या मुद्दयावर चर्चा केली जाईल. जेणेकरून हे मृत्यू टाळता आले असते. ऑमिक्रॉनची बहुतांश लक्षणं सौम्य स्वरूपाची असतात. संसर्ग झालेल्या काही रुग्णांमध्ये तर लक्षणंच दिसून येत नाही. पण हा फ्लू प्रमाणेच घातक ठरू शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी ओमिक्रॉन जीवघेणा ठरू शकतो’, नोयमर यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

अमेरिकेच्या साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंधक (सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेशन) केंद्राचे संचालक डॉ. रोशेल वालेस्की यांनीही ओमिक्रॉनबद्दल इशारा दिला होता. ‘सौम्य लक्षणं असतील, तर त्याचा अर्थ निश्चित राहण असा नाहीये. एका व्यक्तीचं उदाहरण देत वालेस्की यांनी ओमिक्रॉनच्या घातकतेबद्दल भाष्य केलं होतं.

‘मिलफोर्डमधील डेलावेअर येथे राहणाऱ्या चक (वय 50) व्यवसाय करायचा. तो एकदम व्यवस्थित होता. ख्रिसमसच्या आधी त्याला चकला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला. त्यानंतर अवघ्या एका आठवड्याच्या आत चकचा कोरोनामुळे मृत्यू झाला,’ असं वालेस्की यांनी म्हटलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT