Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत, भारत सरकारकडून नव्या गाइडलाइन जारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: ओमिक्रॉन या कोरोना संसर्गाच्या नवीन प्रकाराने संपूर्ण जग पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली गेले आहे. दरम्यान, मागील अनुभव पाठिशी असल्याने भारतात तात्काळ याप्रकरणी बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. याच दरम्यान आता केंद्र सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ही नवी मार्गदर्शक तत्त्व 1 डिसेंबर 2021 पासून लागू होणार आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Omicron Variant)आढळून येण्याची शक्यता जास्त आहे त्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच कोव्हिड-19 चाचणी केली जाईल.

दरम्यान, त्या व्यक्तींचा चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत तिथे थांबावे लागेल. तसंच जरी टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी प्रवाशांना सात दिवस होम क्वारंटाईनमध्येच राहावे लागणार आहे. तसेच आठव्या दिवशी पुन्हा कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

केंद्र सरकारने 12 देशांची यादी तयार केली आहे. जिथे नवीन प्रकारांचा धोका जास्त आहे. यामध्ये यूके, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल यासह युरोपातील सर्व देशांचा समावेश आहे.

या देशांव्यतिरिक्त इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळाबाहेर येण्याची परवानगी असेल. त्यामुळे त्यांना 14 दिवस निरीक्षणाखाली राहावे लागणार आहे.

ADVERTISEMENT

कोरोनाच्या दोन लाटांनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (Omicron Variant) जगभरात भीतीचं सावट पसरलं आहे.

ADVERTISEMENT

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट (उत्परिवर्तित विषाणूचा प्रकार) आढळला असून, तो डेल्टापेक्षाही घातक असल्याचं सांगितलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं असून, व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणून घोषित केलं आहे. यामुळे जगभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही

देशांनी प्रतिबंधात्मक उपायांचा भाग म्हणून दक्षिण आफ्रिकेसह त्या खंडातील सहा देशांतील प्रवासावर निर्बंध जारी केले आहेत.

भारतातही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरूवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी बैठक घेतली. ज्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवी गाइडलाइन जारी केली जाईल.

Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन व्हेरिएंट किती धोकायदायक? लस प्रभावी आहे का?

व्हेरिएंट आणि म्युटेशन म्हणजे काय?

व्हायरसचाही जिनोम सिक्वेन्स (जनुकीय रचना) असतो. व्हायरच्या जिनोममध्ये सातत्याने बदल होतं जातो, त्यालाच म्युटेशन असं म्हटलं जातं. कोरोना व्हायरच्या जिनोममध्येही सातत्याने बदल होत असून, जगभरात चार व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (अल्फा, बीटा, गामा, डेल्टा ), तर दोन व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट (ल्युम्ब्डा, म्यू) आढळून आले आहेत. यातच आता दक्षिण आफ्रिकेत B.1.1.529 हा व्हेरिएंट आढळून आला असून, तो व्हेरिएंट ऑफ कन्सर्न आहे. B.1.1.529 या कोरोना व्हेरिएंट जागतिक आरोग्य संघटनेनं ओमिक्रॉन व्हेरिएंट असं नाव दिलं आहे.

दक्षिण आफ्रिकेतील नेटवर्क फॉर जिनोमिक्स निगराणी नेटवर्क अर्थात NGS-SA (Network for Genomics Surveillance in South Africa) ला सोमवारी (22 नोव्हेंबर) हा नवीन व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट आल्याचं प्रथम जाहीर करण्यात आलं. या व्हेरिएंटमध्ये SARS-CoV-2 संबंधित व्हायरस आढळून आले आहेत.

ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये कोरोनाचे अनेक म्युटेशन आढळून आले आहेत. त्यामुळे या व्हेरिएंटचा संसर्गांचा वेग प्रचंड असल्याचं शास्त्रज्ञांकडून सांगितलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेत गेल्या दोन आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल चार पटीने वाढ झाली असून, ही वाढ B.1.1.529 चा आढळून आल्यानंतर झाल्याचं दिसून आलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT