Covid-19: कोरोनावरील उपचारासाठी आता WHO ने सांगितली 2 नवी औषधं, किती आहेत प्रभावी?

2 new medicines for the treatment of covid 19: कोरोनावरील उपचारासाठी दोन नवी औषधं आता आली आहेत. त्याबाबतची शिफारस WHO ने केली आहे.
Covid-19: कोरोनावरील उपचारासाठी आता WHO ने सांगितली 2 नवी औषधं, किती आहेत प्रभावी?
omicron variant who told 2 new medicines for the treatment of covid 19 know how effective(प्रातिनिधिक फोटो)

Omicron cases in India: कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचे रुग्ण हे सातत्याने वाढत आहेत. अशावेळी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी कोव्हिड-19 च्या उपचारांसाठी दोन नवीन औषधांची शिफारस केली आहे. या दोन नवीन औषधांची नावे बारिसिटिनिब आणि कासिरिविमॅब-इमदिविमॅब अशी आहेत.

पीयर रिव्यू जर्नल BMJ मधील आरोग्य संस्थेच्या तज्ज्ञांनी सांगितले की, गंभीर आजारी रूग्णांवर उपचार करण्यासाठी कॉर्टिकोस्टिरॉईड्ससह बारिसिटिनिबचा वापर केला जाऊ शकतो. हे औषध सामान्यतः संधिवात उपचारांमध्ये वापरले जाते.

WHO चे म्हणणे आहे की, हे औषध व्हेंटिलेटरची गरज कमी करते आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय रुग्णाला असलेला जीवाचा धोका कमी करू शकते. त्याचा परिणाम आर्थरायटिसच्या दुसऱ्या औषधासारखाच इंटरल्यूकिन-6 (IL-6)सारखा असतो.

तुमच्याकडे दोन्ही औषधांना पर्याय असल्यास किंमत, उपलब्धता आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आधारित औषध खरेदी करा. दोन्ही औषधे एकाच वेळी घेण्याची चूक करू नका.

WHO ने परिस्थिती लक्षात घेऊन या मार्गदर्शक सूचना अपडेटमध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडी सोट्रोविमॅब वापरण्याची शिफारस देखील केली आहे. हे कमी गंभीर संक्रमण असलेल्या परंतु रुग्णालयात दाखल होण्याच्या धोका असलेल्या रुग्णांना दिले जाऊ शकते. WHO ने आणखी एक मोनोक्लोनल अँटीबॉडी औषध कॅसिरिविमॅब-इमडिविमॅबसाठी देखील अशीच शिफारस केली आहे.

तथापि, WHO ने जारी केलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, मोनोक्लोनल अँटीबॉडी उपचारांची शिफारस करण्यासाठी पुरेसा डेटा उपलब्ध नाही. तसेच आरोग्य संस्थेने हे देखील मान्य केले आहे की, ओमिक्रॉन सारख्या नवीन व्हेरिएंटविरूद्ध त्याच्या प्रभावशीलतेबाबत फारशी माहिती नाही. मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा पुरेसा डेटा प्राप्त होताच त्याची मार्गदर्शक तत्त्वे अपडेट केली जातील.

omicron variant who told 2 new medicines for the treatment of covid 19 know how effective
Covid19: तुफान वेगाने पसरतोय कोरोना, देशात 24 तासात तब्बल 2 लाख 68 हजार जण पॉझिटिव्ह

WHOच्या या शिफारसी 4,000 सामान्य, कमी गंभीर आणि अधिक गंभीर संक्रमित रूग्णांवर सात चाचण्यांमध्ये आढळलेल्या पुराव्यावर आधारित आहेत. हे सर्व रुग्ण लिविंग गाइडलाइनचा भाग आहेत. जे WHO ने मॅजिक एव्हिडन्स इकोसिस्टम फाऊंडेशनच्या मेथडॉलॉजिकल सहकार्याने विकसित केलं आहे. जेणेकरून कोव्हिड-19 व्यवस्थापनासाठी विश्वसनीय मार्गदर्शक तत्त्वे दिले जावेत आणि रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरही चांगले निर्णय घेऊ शकतात.

तुफान वेगाने पसरतोय कोरोना

भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 2,68,833 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे कालच्या (14 जानेवारी) तुलनेत 4,631 ने अधिक आहेत. नवीन रुग्ण आढळल्यानंतर देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 14 लाख 17 हजार 820 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णांमध्ये 1,45,747 ची वाढ झाली आहे. त्याचवेळी गेल्या 24 तासात 1,22,684 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा 16.66 टक्क्यांवर पोहोचला आहे.

त्याच वेळी, ओमिक्रॉनचे 6 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाचे नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचे 6 हजार 41 रुग्ण आढळले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in