चिंताजनक… Omicron मुळे देशात येणार कोरोनाची महालाट, IIT च्या वैज्ञानिकांचा दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या (Coronavirus) नवीन व्हेरिएंटमुळे कोव्हिड-19 ची तिसरी लाट (Third Wave) फेब्रुवारीमध्ये भारतात येऊ शकते. ही चिंताजनक बाब ताज्या अभ्यासात समोर आली आहे. ज्यात दावा करण्यात आला आहे की, फेब्रुवारी 2022 मध्ये, Omicron व्हेरिएंटचे रुग्ण भारतात पीकवर असू शकतील. भारताने याबाबत काळजी करण्याऐवजी सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचेही अभ्यासाचा हवाला देऊन म्हटले आहे.

संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी असाही दावा केला आहे की, फेब्रुवारीनंतर पुढील महिन्यात ओमिक्रॉनचे रुग्ण कमी होऊ लागतील. ज्यामुळे काहीसा दिलासा मिळेल. तथापि, भारतातील ओमिक्रॉन व्हेरिएंटची एकूण रुग्णसंख्या ही 220 झाली आहे.

IIT कानपूरचे मनिंद्र अग्रवाल आणि Sutra model of tracking the pandemic trajectory चे सहसंस्थापक IIT हैदराबादचे एम विद्यासागर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अशी माहिती दिली की, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे दररोज 1.5 ते 1.8 लाख रुग्ण सापडू शकतात. जर नवीन व्हेरिएंटपासून संरक्षण नैसर्गिकरित्या किंवा लसीकरणाद्वारे राखले गेले तरच रुग्ण संख्येत काही प्रमाणात घट होऊ शकते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘जेवढ्या वेगाने रुग्ण वाढतील तेवढ्याच वेगाने रुग्णांची संख्या कमीही होईल’

मनिंद्र अग्रवाल म्हणाले की, ‘नवीन व्हेरिएंट जेवढ्या वेगाने वाढेल तितक्याच वेगाने तो कमीही होईल. दक्षिण आफ्रिकेतील रुग्णांची संख्या ही तीन आठवड्यांत उच्चांक गाठल्यानंतर आता घटू लागली आहे. 15 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत कोरोना रुग्णांची सरासरी संख्या सुमारे 23,000 वर पोहोचली होती. आता ते 20,000 पर्यंत खाली आले आहेत.

ADVERTISEMENT

आयआयटी प्राध्यापकांचे असे मत आहे की, ‘ओमिक्रॉनच्या बाबतीत भारताने काळजी न करता फक्त योग्य त्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. मात्र, नव्या व्हेरिएंटबाबत एक गोष्ट अद्यापही माहित नाही की, तो किती प्रमाणात घातक आहे.’

ADVERTISEMENT

ते पुढे असंही म्हणाले की, ‘यूके आणि अमेरिकेतील रुग्ण, मृत्यू आणि हॉस्पिटलायझेशनच्या डेटावरून अनुमान काढल्यास फेब्रुवारीपासून ओमिक्रॉनचा प्रभाव कमीही असू शकतो.’

देशात ओमिक्रॉनची किती रुग्ण?

भारतात सर्वाधिक महाराष्ट्र (65), दिल्ली (54), तेलंगणा (24), कर्नाटक (19), राजस्थान (18), केरळ (15), गुजरात (14), जम्मू (3), यूपी (2), ओडिशा (2) आंध्र प्रदेश (1), चंदीगड (1), तामिळनाडू (1) आणि बंगाल (1) येथे ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत.

यूकेमध्ये 45 हजारांहून अधिक रुग्ण

यूकेच्या आरोग्य सुरक्षा एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 20 डिसेंबर रोजी तेथील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ही 45,000 हजाराहून अधिक होती. त्यापैकी 129 रूग्णालयात आहेत तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

Omicron Variant : नाईट कर्फ्यूसह निर्बंध लावण्याची केंद्राची सूचना; राज्यांना अलर्ट

ब्रिटनमध्ये पुन्हा रुग्ण संख्येत वाढ

ब्रिटनमध्ये पूर्वीप्रमाणेच कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. तर दररोज नवीन रुग्णांच्या बाबतीत आठवड्यातून 61 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं दिसून आलं आहे. त्याच वेळी, रुग्णालयात दाखल होण्याच्या बाबतीत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत मृतांच्या संख्येत 5 टक्क्यांनी घट झाली आहे.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या वेलकम सेंटर फॉर ह्यूमन न्यूरोइमेजिंगच्या अंदाजानुसार, यूकेमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोव्हिड-संबंधित मृत्यू आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या ही अधिक असेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT