"एक चुकीची खेळी आणि मी सत्तेचा पट हरलो...." बुद्धिबळ स्पर्धेत फडणवीसांचं वक्तव्य

जाणून घ्या काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
One wrong move and misreading the opponents and I lost the game of power from a winning position Says Devendra Fadnavis
One wrong move and misreading the opponents and I lost the game of power from a winning position Says Devendra Fadnavis

बुद्धीबळ हा असा खेळ आहे जो अत्यंत सावधपणे खेळावा लागतो. प्रत्येक चाल व्यवस्थित विचार करून खेळावी लागते. तुम्ही एक जरी खेळी चुकली तरीही ग्रँडमास्टरचाही पराभव होतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की तुम्ही जर एक खेळी चुकली तर पराभव निश्चित होतो. २०१९ लाही राजकारणाच्या पटावर एका ग्रँडमास्टरचा पराभव झालेला आपण पाहिला असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केलं आहे. बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घघाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

बुद्धिबळ हा असा खेळ आहे जो तुम्हाला अत्यंत सावधगिरीने खेळावा लागतो. या खेळात एक चाल चुकली की सगळा खेळ फिरतो. २०१९ ला महाराष्ट्राच्या राजकीय पटावर पण हेच झालं त्यामुळे ग्रँड मास्टरला पराभव पत्करावा लागला असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

२०१९ ला भाजप आणि शिवसेनेने युती करत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपचे १०५ आणि शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले. १४५ चा बहुमताची संख्या त्यांनी सहजच पार केली होती. मात्र अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद या मागणीवर शिवसेना ठाम राहिली. भाजपने ही मागणी मान्य केली नाही. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रयोग झाला तो प्रयोग होता भाजप आणि राष्ट्रवादीचं ७२ तासांसाठी आलेलं सरकार. पहाटेच्या या शपथविधीने सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलं होतं. हे सरकार चाललं नाही. त्यामुळे बरखास्त झालं.

त्यानंतर कधीही शक्य वाटत नव्हता असा प्रयोग महाराष्ट्राने पाहिला तो होता महाविकास आघाडीचा प्रयोग. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या महाविकास आघाडीचे शिल्पकार ठरले.

एवढंच नाही तर भाजप हा पक्ष सर्वात मोठा असूनही या पक्षाला विरोधात बसावं लागलं. त्यानंतर भाजपने सातत्याने या तीन पक्षांवर टीका करणं सुरू ठेवलं आहे. अशात आता आज बुद्धिबळ असो किंवा राजकारणाचा पट आपली चूक होता कामा नये, नाहीतर ग्रँडमास्टरचाही पराभव होतो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in