Amrapali Gan अॅडल्ट वेबसाइट OnlyFansच्या नव्या सीईओ, ठाऊक आहे का मुंबई कनेक्शन?

Amrapali Gan अॅडल्ट वेबसाइट OnlyFansच्या नव्या सीईओ, ठाऊक आहे का मुंबई कनेक्शन?

जगभरातील मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची वर्णी लागताना दिसते आहे. या यादीत आता आम्रपाली गन या मूळच्या मुंबईच्या असलेल्या व्यक्तीचीही भर पडली आहे. अॅडल्ट वेबसाइट OnlyFans च्या सीईओ म्हणून आम्रपाली गान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आम्रपाली गन यांचा जन्म मुंबईत झाला आहे. त्या आता अॅमी गन या नावाने ओळखल्या जातात. मात्र त्यांचं मुंबई कनेक्शन समोर आलं आहे.

OnlyFans कंपनीचे संस्थापक टिम स्कोकली यांनी आपलं पद सोडलं आहे. त्यानंतर 21 डिसेंबरपासून OnlyFans च्या सीईओ पदी आम्रपाली गन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आम्रपाली अर्थात अॅमी यांना हे पद मिळाल्यापासूनच त्यांचं नाव इंटरनेटवर सर्च केलं जातं आहे त्या कोण आहेत त्याची माहिती काढली जाते आहे.

कोण आहेत आम्रपाली गन?

आम्रपाली गन यांनी या आधी ओन्लीफॅन्स (OnlyFans) या कंपनीत मार्केटिंग आणि कम्युनिकेशन या विभागाच्या प्रमुखपदी काम केलं आहे. आम्रपाली गन यांनी यापूर्वी रेड बुल आणि क्वेस्ट न्युट्रिशन या कंपन्यांमध्ये मोठी पदं सांभाळली आहेत.

टिम स्टोकली यांनी 2016 साली OnlyFans या सबस्क्रिप्शन आधारित असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची स्थापना केली होती. टिम स्टोकली यांनी आपला पदभार आम्रपाली गन यांना सोपवताना म्हटलं आहे की, आम्रपाली या कंपनीच्या सहकारी आणि चांगल्या मैत्रिण आहेत. त्यांच्या नेतृत्वात कंपनी चांगली प्रगती करेल असा विश्वास आहे.

आम्रपाली गन यांचे शिक्षण हॉवर्ड बिजनेस स्कूलमधून झालं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हरसिटीमधून पब्लिक रिलेशन अॅन्ड ऑर्गनायझेशन कम्युनिकेशन पदवी घेतली आहे. तसेच त्यांनी एफआयडीएम या संस्थेतून मर्केन्टाईज मार्केटिंगचे शिक्षण पूर्ण केलं आहे.

आम्रपाली गन यांची कारकीर्द

OnlyFans च्या मार्केटिंग आणि कम्युनिकेशन या विभागाच्या प्रमुखपदी काम

मार्केटिंग आणि पब्लिसिटी विभागाच्या उपाध्यक्ष, कॅनिबिज कॅफे कंपनीच्या

डायरेक्टर कम्युनिकेशन, लोवेल हर्ब को. कंपनी

ब्रँड अॅक्टिव्हेशन आणि कम्युनिकेशन मॅनेजर, रेड बुल मीडिया हाऊस

मुख्य स्टाईलसेंट मार्केटिंग मॅनेजर, क्विस्ट न्युट्रिशन डायरेक्टर आणि ब्रँड कम्युनिकेशन

मार्केटिंग लिडरशिप प्रोग्रॅमच्या प्रमुख, पेप्सिको

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in