Corona : इटलीहून भारतात आलेल्या विमानात कोरोना विस्फोट!.... 170 पैकी 125 प्रवासी पॉझिटिव्ह

Corona : इटलीहून भारतात आलेल्या विमानात कोरोना विस्फोट!.... 170 पैकी 125 प्रवासी पॉझिटिव्ह

इटलीहून भारतात आलेल्या विमानात कोरोनाचा स्फोट झाला आहे असंच म्हणता येईल कारण या विमानातल्या 170 पैकी 125 जणांना कोरोना झाला आहे. या सगळ्यांना अमृतसरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ANI ने अमृतसर एअरपोर्टचे संचालक वी. के. सेठ यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

आधी असं सांगितलं जात होतं की हे विमान एअर इंडियाचं आहे. मात्र एअर इंडियाने हे विमान आमचं नाही असं सांगितलं. आमचं कोणतंही विमान आता रोमहून भारतात येत नाही असंही त्यांनी सांगितलं. देशात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. मागच्या चोवीस तासात देशात कोरोनाचे 90 हजार 928 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसंच 325 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण देशातल्या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू आणि केरळ या पाच राज्यांमध्ये पाहण्यास मिळत आहेत. महाराष्ट्रात बुधवारी 26 हजारांहून जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.देशात जे 90 हजाराहून जास्त रूग्ण आढळले त्यापैकी 66 टक्के कोव्हिडबाधित रूग्ण हे या पाच राज्यांमध्ये आहेत. तर महाराष्ट्रात 29.19 टक्के कोरोना रूग्ण आहेत.

देशात ओमिक्रॉनचं संकटही गहिरं झालं आहे. देशातल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने बाधित रूग्णांची संख्या 2630 झाली आहे. ओमिक्रॉन संसर्गाच्या बाबत विचार केला तर महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सर्वाधिक रूग्ण आहेत. ओमिक्रॉन च्या 2630 रूग्णांपैकी 995 जणांना त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात आलं आहे.

मागच्या चोवीस तासात जगात कोरोनाचे 25 लाख रूग्ण आढळले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक रूग्ण आहेत. या ठिकाणी आत्तापर्यंत 58,805,186 केसेस आल्या आहेत. भारतात 35,109,286 केसेस समोर आल्या आहेत. यानंतर ब्राझिल, युके, फ्रान्स, रशिया, जर्मनी आणि तुर्की या देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर रूग्ण आढळले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in