Covid 19: महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच, दिवसभरात 18 हजार 466 नव्या रूग्णांची नोंद

महाराष्ट्रात दिवसभरात ओमिक्रॉनचे 75 रूग्ण
Covid 19: महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच, दिवसभरात 18 हजार 466 नव्या रूग्णांची नोंद
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. दिवसभरात 18 हजार 466 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 20 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.1 टक्के झाला आहे. आज दिवसभरात राज्यात 4 हजार 558 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत एकूण 65 लाख 18 हजार 916 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातले रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.86 टक्के झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 95 लाख 9 हजार 260 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 67 लाख 30 हजार 494 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 98 हजार 391 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1 हजार 110 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी. (प्रातिनिधीक छायाचित्र)
कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी. (प्रातिनिधीक छायाचित्र)PTI

महाराष्ट्रात दिवसभरात 75 ओमिक्रॉन रूग्णांची नोंद झाली आहे. हे सगळे अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिले आहेत. मुंबईत 40, ठाणे मनपात 9, पुणे मनपात 8, पनवेल 5, नागपूर आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी 3, पिंपरी चिंचवडमध्ये 2, भिवंडी, उल्हासनगर, सातारा, अमरावती, नवी मुंबईमध्ये प्रत्येकी 1 रूग्ण आढळला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात आढळलेल्या ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 653 झाली आहे. यापैकी 259 रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

कोरोना रूग्णसंख्या
महाराष्ट्र सरकारने संथ गतीने काम करणं सोडावं, कोरोना परिस्थितीवरून भारती पवार यांची टीका

राज्यात 1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 2397 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 91 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यात आज रोजी एकूण 66,308 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात 18,466 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 67,30,494 झाली आहे.

कोरोना रुग्ण संख्या
कोरोना रुग्ण संख्या (प्रातिनिधिक फोटो)

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाही त्यामुळे मुंबईत्या वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेनेच चालली आहे हे समोर येतं आहे. मुंबईत दिवसभरात 10 हजार 680 नवे रूग्ण दिवसभरात आढळले आहेत. तर दिवसभरात 654 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 वरून 92 टक्क्यांवर आला आहे. मुंबईत सध्याच्या घडीला 47 हजार 476 सक्रिय रूग्ण आहेत. 28 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीतला रूग्ण वाढीचा दर अर्थात ग्रोथ रेट हा 0.63 टक्के इतका आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in