महाराष्ट्र पुन्हा कोरोनाच्या विळख्यात? दिवसभरात 9 जणांचा मृत्यू; 1100 पॉझिटिव्ह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Number of corona patients increased in Maharashtra, death of nine covid positive patient
Number of corona patients increased in Maharashtra, death of nine covid positive patient
social share
google news

Maharashtra Corona Update :

मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असतानाच महाराष्ट्रातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढीचा वेग धडकी भरवणारा आहे. महाराष्ट्रात आज (12 एप्रिल) तब्बल 1 हजार 115 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात आज 9 जणांचा कोरोनाने मृत्यू (Corona Patient Death) झाला आहे. त्यामुळे आता कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्राची चिंता वाढविण्यास सुरुवात केली आहे.  आज घडीला राज्यात 5 हजार 421 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील एकट्या मुंबईमध्ये 1 हजार 577 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. (Number of corona patients increased in Maharashtra, death of nine covid positive patient)

बहुतेक रुग्ण लक्षणे नसलेले

दरम्यान, आकडेवारी वाढत असली तरीही बहुतेक रुग्ण हे लक्षण नसलेले आहेत. मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, “केस वाढत आहेत परंतु बहुतेक रुग्ण लक्षणे नसलेले आहेत आणि घरीच बरे होत आहेत. जर एखाद्या रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आली आणि तो होम आयसोलेशनमध्ये असेल, तर त्याला सात दिवसांनी डिस्चार्ज समजला जातो,” असे बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला अपघात, जखमी झाल्याने शूटिंग रद्द

नवीन उप-प्रकार वेगाने पसरत आहे

भारतीय SARS-Cov-2 Genomics Consortium (INSACOG), भारत सरकारने स्थापन केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळांची एजन्सीनुसार, Omicron चे subvariant XBB.1.16 भारतात कोविड-19 प्रकरणांच्या संख्येत सातत्याने वाढ होण्यामागे आहे, जे सध्या 60 टक्के प्रकरणे आहेत. दुसर्‍या अहवालानुसार, भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम प्रयोगशाळेच्या सदस्याने म्हटले आहे की देशातील 25 ते 30 टक्के प्रकरणे XBB प्रकार आणि फक्त त्याच्या उप-प्रकारांची आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 27 फेब्रुवारी 2023 ते 26 मार्च 2023 या कालावधीत देशातील कोविडच्या वाढत्या प्रकरणांवर म्हटले आहे की, Omicron प्रकाराचे नवीन उप-प्रकार XBB.1.16 भारतातील वाढत्या कोरोनाच्या मागे आहे.

CM शिंदे-फडणवीसांची मुलाखत, रितेश देशमुखशी गप्पा; ‘मुंबई Tak बैठक’ असणार खास

मुंबई महापालिका सज्ज

‘केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोविड रूग्णसंख्या वाढीबाबतचा वर्तवलेला अंदाज पाहता संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. सक्ती नसली तरी काही मार्गदर्शके खबरदारीचा उपाय म्हणून निर्गमित करावयाची आहेत. वैद्यकीय अंदाजानुसार येत्या मे महिन्यामध्ये कोविड संसर्गाच्या रूग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, मुंबईतील महानगरपालिकेच्या सोबतच खासगी रुग्णालयांच्या ठिकाणीही रूग्णशय्या सज्ज ठेवणे आवश्यक आहे’, असे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत.

ADVERTISEMENT

कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमध्ये ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना अधिक धोका असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील ६० वर्षेपेक्षा अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, त्याचप्रमाणे सहव्याधी असलेल्या नागरिकांनी मास्कचा सातत्याने उपयोग करणे हे त्यांच्यासाठी सुरक्षित ठरेल. त्यांना मास्कची सक्ती नसली तरी खबरदारी घेणे हे अधिक योग्य आहे. शक्यतो, सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. त्याबाबतची सूचना आरोग्य विभागाकडून तातडीने प्रसारित करण्यात यावी.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT